Navratri Recipe: नवरात्रीत बनवा कांदा लसणाशिवाय टेस्टी पनीर मखनी, वाचा सोपी रेसिपी

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Sep 16, 2022 | 15:39 IST

Shardiya Navratri 2022 Recipe: पनीर मखनी बनवण्याची प्रत्येकाची स्वतःची वेगळी स्टाइल असते, पण प्रत्येकजण त्यात कांदा लसूण वापरतो. जर तुम्ही नवरात्रात कांदा लसूण खात नसाल तर त्याशिवाय पनीर मखनी बनवून बघू शकता.

Shardiya Navratri 2022 Recipe of Paneer Makhani
बोट चाखत खाल अशी कांदा लसणाशिवाय बनवा टेस्टी पनीर मखनी 
थोडं पण कामाचं
 • हिंदू कॅलेंडरनुसार 26 सप्टेंबरपासून नवरात्रीला (Navratri) सुरुवात होत आहे.
 • नवरात्रीची समाप्ती 5 ऑक्टोबरला होणार आहे. काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास ठेवतात, तर काही लोक खाण्यापिण्याबाबत नियम पाळतात.
 • तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा-लसूणाशिवायही चविष्ट भाजी बनवू शकता

नवी दिल्ली: Shardiya Navratri 2022 Recipe of Paneer Makhani: हिंदू कॅलेंडरनुसार 26 सप्टेंबरपासून नवरात्रीला (Navratri) सुरुवात होत आहे.  नवरात्रीची समाप्ती 5 ऑक्टोबरला होणार आहे. काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास ठेवतात, तर काही लोक खाण्यापिण्याबाबत नियम पाळतात. अशा स्थितीत बहुतेक लोक नवरात्रात कांदा आणि लसूण खाणे बंद करतात. या दोन्ही गोष्टी बहुतेक घरांमध्ये तयार होणाऱ्या अन्नात वापरल्या जात नाहीत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा-लसूणाशिवायही चविष्ट भाजी बनवू शकता. बहुतेक लोकांना कांदा आणि लसूण खाण्याची इतकी सवय असते की त्यांना कांदा आणि लसूणशिवाय कुठलीही डिश समजत नाही. नवरात्रीच्या काळात असे लोक विचार करत राहतात की काय बनवायचं? अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात तुम्ही कांदा आणि लसूण शिवाय (without onion and garlic)  पनीर मखनी ट्राय करू शकता (try paneer makhani). बनवायला खूप सोपी आहे.  (Make Tasty Paneer Makhani without Onion and Garlic on Navratri read easy recipe in marathi)

कांदा लसूण शिवाय पनीर मखनी बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

हे साहित्य आवश्यक असेल

कांदा-लसूण शिवाय पनीर मखनी बनवण्यासाठी चिमूटभर जिरे, तूप किंवा बटर, टोमॅटो प्युरी, फ्रेश क्रीम, टोमॅटो सॉस, चिरलेले पनीर, कसुरी मेथी, पनीर मसाला, साखर, काश्मिरी लाल तिखट, चवीनुसार मीठ लागेल. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कांदा आणि लसूण न घालताही पनीर मखनी खूप चवदार बनते. 

अधिक वाचा-  राइस वॉटर स्किनसाठी वरदान, 'या' पद्धतीनं करा वापर 

कांदा लसणाशिवाय पनीर मखनी बनवण्याची सोपी पद्धत 

 • कांदा-लसूण शिवाय पनीर मखनी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात तूप किंवा बटर टाकून गरम करा.
 • आता त्यात जिरे आणि टोमॅटो प्युरी घालून चांगले मिक्स करा.
 • त्यानंतर मीठ, हळद, गरम मसाला, काश्मिरी मिरची आणि पनीर मसाला घालून थोडा वेळ शिजू द्या. 
 • नंतर त्यात क्रीम, आणि टोमॅटो सॉस घालून मिक्स करा. 
 • आता झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवा. 
 • नंतर त्यात साखर घाला, नीट मिक्स करा आणि पनीरचे तुकडे घाला. 
 • नंतर त्यावर कोथिंबीर टाकून चांगली शिजू द्यावी.
 • तुमची कांदा-लसूण नसलेली पनीर मखनी तयार होईल. 
 • कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना ते सर्व्ह करा.

(अस्वीकरण: या लेखात सुचविलेल्या टिपा आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक सल्ला म्हणून समजू नये.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी