Independence Day 2022: स्वातंत्र्यदिनी नैसर्गिक रंगांनी बनवा टेस्टी तिरंगा ढोकळा, जाणून घ्या झटपट होणारी सोपी रेसिपी

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 15, 2022 | 09:09 IST

Independence Day 2022 Recipe: यावेळी जर तुम्हाला स्वातंत्र्य दिन काही खास पद्धतीने साजरा करायचा असेल तर तिरंग्याच्या तीन रंगांचा ढोकळा बनवा. जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी.

Tricolour Dhokla Recipe
तिरंगा ढोकळा रेसिपी 
थोडं पण कामाचं
  • आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे.
  • स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक वास्तूंनाही तिरंग्याच्या (Tricolor) रंगांनी रंगवलं आहे. महिला देखील तिरंग्याच्या तीन रंगांचे कपडे परिधान करतात.
  • स्वातंत्र्यदिनाच्या या खास मुहूर्तावर तुम्हालाही काही खास रेसिपी बनवावयची असेल, तर ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

नवी दिल्ली: Independence Day 2022 Tricolour Dhokla Recipe: आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिन (Independence Day). आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वातंत्र्याचा (Independence Day 2022) अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक वास्तूंनाही तिरंग्याच्या (Tricolor) रंगांनी रंगवलं आहे. महिला देखील तिरंग्याच्या तीन रंगांचे कपडे परिधान करतात.

यंदा भारतीय 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. यंदा स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या खास मुहूर्तावर तुम्हालाही काही खास रेसिपी बनवावयची असेल, तर ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. 

अधिक वाचा- क्लीन चिट मिळताच समीर वानखेडेंचा पलटवार, नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ    

आज तुम्ही तिरंगा ढोकळा बनवू शकता. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि जेव्हा तुम्ही ती बनवून प्लेटमध्ये सर्व्ह कराल तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ती नक्की आवडले. जाणून घ्या नैसर्गिक रंगांनी तिरंगा ढोकळा कसा तयार करायचा.

तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

3 कप ढोकळा पीठ (3 कप रवा आणि 1 कप दह्यांनं सुद्धा तुम्ही ढोकळ्याचं झटपट पीठ बनवू शकता), चवीनुसार मीठ, इनो किंवा फ्रूट सॉल्ट, आले पेस्ट, तेल, हिरव्या रंगासाठी 1 वाटी पालक प्युरी, लाल मिरची पावडर, कोथिंबीर बारीक चिरून , केशरी खाद्य रंग, मोहरी, कढीपत्ता, साखर, लिंबाचा रस.

तिरंगा ढोकळा बनवण्याची कृती

तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी तीन वाट्यांमध्ये वेगवेगळ्या पेस्ट तयार करा. आल्याची पेस्ट तिन्हींमध्ये थोडी-थोडी घाला. चवीनुसार मीठ आणि पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. एका भांड्यात पालक प्युरी हिरव्या रंगासाठी घाला. एक वाटी पांढरी सोडा. तिसऱ्या वाटीच्या पिठात थोडा केशरी रंग घाला. ढोकळा झटपट बनवायचा असेल तर पिठात इनो किंवा फ्रूट सॉल्ट टाका.

तीन साचे घेऊन त्यावर ढोकळ्याचे पीठ टाका. ढोकळा शिजल्यावर थोडा थंड करून घ्यावा. आता एका कढईत तेल तापवायला ठेवा. त्यात मोहरी तडतडून त्यात कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाका. लिंबाचा रस आणि साखर घालून शिजवा. पाणी उकळू द्या आणि ढोकळ्यावर टाकून पसरवा. आता प्लेटमध्ये तिरंगा ढोकळा सर्व्ह करा. तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत हा खाऊ शकता.

(अस्वीकरण: या लेखात सुचविलेल्या टिपा आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक सल्ला म्हणून समजू नये.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी