Relationship Tips: पुरुषांच्या ‘या’ सवयी जातात पार्टनरच्या डोक्यात, तुटू शकतं नातं

प्रत्येक महिलेला तिच्या पार्टनरसोबत असणाऱ्या नात्यात काही मूलभूत गोष्टींची अपेक्षा असते. या गोष्टी मिळाल्या नाहीत आणि वारंवार या अपेक्षा भंग होत गेल्या, तर नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्या पुरुष पार्टनरच्या काही सवयी या पुरुषांना अजिबात आवडत नाहीत.

Relationship Tips
पुरुषांच्या ‘या’ सवयी जातात पार्टनरच्या डोक्यात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रेमसंबंधात अनेक सवयी ठरू शकतात घातक
  • एकमेकांचा विचार करण्याची असते गरज
  • नात्यात असताना इतर मुलींशी करू नका फ्लर्ट

Relationship Tips: महिला जेव्हा एखाद्या पुरुषावर प्रेम (Love Relationship) करतात आणि त्याच्यासोबत आपलं पूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतात, तेव्हा पुरुषांवरही एक प्रकारची नैतिक जबाबदारी (Moral Responsibility) येते. आपल्या पार्टनरच्या भावनांचा (Emotions of partner) विचार करणं, त्यांना आनंदी ठेवणं आणि आपल्या कुठल्याही कृत्यामुळे त्या दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं असतं. प्रत्येक महिलेला तिच्या पार्टनरसोबत असणाऱ्या नात्यात काही मूलभूत गोष्टींची अपेक्षा असते. या गोष्टी मिळाल्या नाहीत आणि वारंवार या अपेक्षा भंग होत गेल्या, तर नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्या पुरुष पार्टनरच्या काही सवयी या पुरुषांना अजिबात आवडत नाहीत. वारंवार समजूत काढूनही पुरुषांनी आपल्या सवयी बदलल्या नाहीत, तर प्रकरण ब्रेकअपपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. 

स्वार्थी विचार

कुठल्याही नात्यात एकमेकांचा विचार करण्याची गरज असते. मात्र काही पुरुष पार्टनर केवळ स्वतःचा विचार करतात. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या पार्टनरचा विचार करत नाहीत. आपल्या निर्णयप्रक्रियेत पार्टनरला सहभागी करून न घेतल्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. 

खोटं बोलण्याची सवय

प्रत्येक नातं हे विश्वासाच्या एका नाजूक धाग्यावर टिकलेलं असतं. त्यामध्ये थोडी जरी शंकाकुशंका, कपट दिसलं तरी हा धागा तुटण्याची शक्यता असते. आपला पार्टनर आपल्याशी खोटं बोलत असल्याची बाब महिलांना अजिबातच आवडत नाही. त्यामुळे तुमच्याकडून काही चूक झाली, तर ती लपवण्याऐवजी ती मान्य करून माफी मागणं अधिक योग्य ठरतं. अन्यथा, त्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Pimples Treatment: टोमॅटोच्या 'या' ब्युटी पॅकमुळे पिंपल्सपासून होईल सुटका

लक्ष न देणे

रिलेशनशिपमध्ये असूनही जर तुम्ही आपल्या पार्टनरकडे लक्ष देत नसाल, तर या नात्याची तुम्हाला कदर नसल्याचं त्यातून दिसून येतं. तुमच्या पार्टनरसाठी वेळ न काढणे हा नातं संपवण्याचाच प्रकार असल्याचं मानलं जातं. त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या मनात राग आणि गैरसमज जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या पार्टनरसाठी वेळ काढा. त्यांच्यासोबत फिरायला जाणे, जेवायला जाणे, सहलीला जाणे यासारखे कार्यक्रम प्लॅन करा आणि ते प्रत्यक्षात उतरवा. त्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल. 

अधिक वाचा - Blackheads Removal Tips: डेड स्किन-ब्लॅकहेड्सला म्हणा Bye-Bye, लावा हा फेस पॅक; चेहऱ्यावर येईल Glow

इतर मुलींसोबत फ्लर्ट करणे

रिलेशनशिपमध्ये राहणं ही गंभीर गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असता, तेव्हा तुम्ही शंभर टक्के त्यात गुंतलेलं असण्याची अपेक्षा असते. तुम्ही तुमचा पार्टनर सोडून इतर मुलीला फ्लर्ट करणं हे नातेसंबंधातील चिटिंग मानलं जातं. जर तुम्ही तुमची महिला सहकारी, शेजारीण आणि मैत्रिण यांच्याशी फ्लर्ट करत असाल, तर तुमच्या नात्यासाठी ही गोष्ट विषासमान ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या पार्टनरशी एकनिष्ठ राहणे आणि नात्यात असेपर्यंत ते निभावणे आवश्यक असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी