Today in History Monday, 29th August 2022: आज आहे मराठीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आज आहे मराठीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांची पुण्यतिथी, तसेच आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची स्थापना झाली होती. तसेच आज पॉपस्टार मायकल जॅक्सन याचा जन्मदिन आहे. जाणून घ्या आजचे दिनविशेष

today in history 29th august 2022
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे मराठीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांची पुण्यतिथी,
  • आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची स्थापना झाली होती.
  • आज पॉपस्टार मायकल जॅक्सन याचा जन्मदिन आहे.

Today in History Monday, 29th August 2022: आज आहे २९ ऑगस्ट २०२२, आज आहे मराठीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांची पुण्यतिथी, तसेच आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची स्थापना झाली होती. तसेच आज पॉपस्टार मायकल जॅक्सन याचा जन्मदिन आहे. जाणून घ्या आजचे दिनविशेष. (marathi actress jayashree gadkar death anniversary and Michel Jackson birthday know today in history 29th august 2022 in marathi)

२९ ऑगस्ट - दिनविशेष

  1. ७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख)
  2. २००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
  3. १९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
  4. १९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
  5. १९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
  6. १९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
  7. १८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
  8. १८३३: युनायटेड किंग्डमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
  9. १८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
  10. १८२५: पोर्तुगालकडून ब्राझीलला स्वातंत्र्य.
  11. १४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.

२९ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  1. १९५९: नागार्जुन - दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते
  2. १९५८: मायकेल जॅक्सन - अमेरिकन गायक (निधन: २५ जून २००९)
  3. १९२३: रिचर्ड ऍटनबरो - इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते
  4. १९२३: हिरालाल गायकवाड - भारतीय क्रिकेट खेळाडू
  5. १९१५: इन्ग्रिड बर्गमन - स्वीडीश अभिनेत्री (निधन: २९ ऑगस्ट १९८२)
  6. १९०५: मेजर ध्यानचंद - भारतीय हॉकीपटू - पद्म भूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक (निधन: ३ डिसेंबर १९७९)
  7. १९०१: विठ्ठलराव विखे पाटील - सहकारमहर्षी - पद्मश्री (निधन: २७ एप्रिल १९८०)
  8. १८८७: जीवराज नारायण मेहता - भारतीय डॉक्टर आणि राजकारणी (निधन: ७ नोव्हेंबर १९७८)
  9. १८८०: बापूजी अणे - लोकनायक (निधन: २६ जानेवारी १९६८)
  10. १८६२: अँड्रू फिशर - ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान
  11. १८३०: हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी - आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता
  12. १७८०: ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र - नव-अभिजात फ्रेंच चित्रकार

२९ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  1. २००८: जयश्री गडकर - मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
  2. २००७: बनारसी दास गुप्ता - स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)
  3. १९८६: अण्णासाहेब खेर - पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १५ जून १८९८)
  4. १९८२: इन्ग्रिड बर्गमन - स्वीडीश अभिनेत्री (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)
  5. १९७६: काझी नझरुल इस्लाम - क्रांतिकारक आणि बंगाली कवी - पद्म भूषण (जन्म: २५ मे १८९९)
  6. १९७५: इमॉनडी व्हॅलेरा - आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ ऑक्टोबर १८८२)
  7. १९७५: इमॉन डी व्हॅलेरा - आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १४ ऑक्टोबर १८८२)
  8. १९६९: मेहबूबहुसेन पटेल - लोकशाहीर (जन्म: २० ऑक्टोबर १९१६)
  9. १९६९: शाहीर अमर शेख - लोकशाहीर (जन्म: २० ऑक्टोबर १९१६)
  10. १९११: मीर महबूब अली खान - हैदराबादचा सहावा निजाम (जन्म: १७ ऑगस्ट १८६६)
  11. १९०६: बाबा पद्मनजी मुळे - मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक
  12. १९०४: मुराद (पाचवा) - ओट्टोमन सम्राट
  13. १८९१: पियरे लॅलेमेंट - सायकलचे शोधक (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३)
  14. १७८०: जॅकजर्मन सोफ्लॉट - पंथीयनचे सहरचनाकार (जन्म: २२ जुलै १७१३)
  15. १५३३: अताहु आल्पा - पेरूचा शेवटचा इंका राजा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी