Marathi Bhasha Din 2023 bhashan in Marathi: महाराष्ट्रात दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर / विष्णू वामन शिरवाडकर) यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. या कार्याची आठवण म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.
महाराष्ट्रात 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन, महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन हे दिवस साजरे केले जातात तर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो.
भारतात अधिकृत अशा 22 भाषा आहेत. या भाषांपैकी एक भाषा ही मराठी भाषा आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचे स्थान 15 वे आहे. मराठी ही प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. मराठी भाषेला प्रदीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा आहे. अशा या मोठी परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन साजरा करून केला जातो.
मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आहे. मराठी भाषा जतन करण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांची सुरुवात मराठी भाषा दिन या दिवशी करण्याची पद्धत आहे.
कविवर्य कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यासाठी मोठे योगदान दिले. मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. या त्यांच्या कार्याची आठवण म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.