मराठी नववर्ष: गुढी पाडव्याच्या दिवसासाठी खास सात रांगोळ्या; पाहा व्हिडिओ

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 11, 2021 | 21:41 IST

हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.

 Marathi New Year: Special Rangoli for Gudi Padva Day, watch the vide
मराठी नववर्ष: गुढी पाडव्याच्या दिवसासाठी खास सात रांगोळ्या,  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पुजा केली जाते.
  • भगवान ब्रह्माने गुढी पाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती.
  • भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व

मुंबई :  हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा घालतात. कडुनिंबाची दहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारतात आणि रांगोळी काढत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. गुढी पाडव्या निमित्त आम्ही काही रंगोळीची कृती  सांगणार आहोत.

पाहा व्हिडिओ -

1 पळीच्या मदतीने काढा गुढीची रांगोळी, शोभून दिसले घराचा फ्लोअर

2 गुढी पाडवा नावाची काढा रांगोळी

3 रेखाटून काढा महिलीची रांगोळी

4 बेलनच्या मदतीने तयार करा आकर्षक रांगोळी

5 कलश, तांब्याच्या मदतीने काढा नवीन प्रकारची रांगोळी

6 पळी आणि गाळणीच्या मदतीने काढा गुढी पाडव्याची रांगोळी

7 टूथ ब्रश वापरून काढा सुंदर रांगोळी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी