Balkavi : आज आहे बालकवींचा स्मृतीदिन, त्यानिमित्ताने वाचा त्यांनी लिहिलेल्या अजरामर कविता

आज त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा स्मृतीदिन आहे. त्यांनी मराठी आनंदी, आनंदी गडे, श्रावणमासी हर्ष मानसी सारख्या अनेक अजरामर कविता लिहिल्या. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कविता वाचूया.

balkavi
बालकवी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा स्मृतीदिन आहे.
  • त्यांनी मराठी आनंदी, आनंदी गडे, श्रावणमासी हर्ष मानसी सारख्या अनेक अजरामर कविता लिहिल्या.
  • त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कविता वाचूया.

Balkavi Death Anniversary : आज त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा स्मृतीदिन आहे. त्यांनी मराठी आनंदी, आनंदी गडे, श्रावणमासी हर्ष मानसी सारख्या अनेक अजरामर कविता लिहिल्या. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कविता वाचूया.

इकडे, तिकडे, चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे

श्रावणमासी हर्ष मानसी

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे

देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

– बालकवी

औदुंबर
 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

– बालकवी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी