Today in History: Monday, 25th July 2022:  आज आहे सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे संगीतकार सुधीर फडके यांचा जन्मदिन.
 • आजच १९४८ साली इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध संपले.
 • आजच्या दिवशी १९७८ साली जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.

Today in History: Monday, 25th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

अधिक वाचा : Porn in office : ऑफिसमध्ये काम करताना लोक काय काय पाहतात? रिपोर्ट वाचून बसेल धक्का

२५ जुलै - घटना 

 1. २००७ : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी
 2. १९९९ : लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
 3. १९९७ : के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
 4. १९९७ : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड
 5. १९९४ : इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
 6. १९९२ : स्पेनमधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
 7. १९८४ : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.
 8. १९७८ : जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
 9. १९४३ : दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
 10. १९१७ : कॅनडात आयकर लागू झाला.

अधिक वाचा : Relationship Tips: जाणून घ्या कोणत्या प्रकारचे पुरुष महिलांना जास्त करतात आकर्षित, तुमच्यात आहेत का हे गुण?

२५ जुलै - जन्म

 1. १९१९ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)
 2. १९२९ : सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१८)
 3. १९२२ : विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
 4. १८७५ : जिम कॉर्बेट – ब्रिटिश – भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)

अधिक वाचा : Swapna Shastra: तुमच्या स्वप्नात कावळे दिसले का? पाहा काय असतो याचा अर्थ शुभ की अशुभ

२५ जुलै - निधन 

 1. २०१२ : बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
 2. १९७७ : कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक   
 3. १८८० : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)

अधिक वाचा :  Feng Shui Tips : फेंगशुईच्या उपायांनी आर्थिक सुबत्ता येईल, रिकाम्या तिजोरीत पैसा येईल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी