Marathi Speech For Jyotirao Govindrao Phule 196th birth anniversary : महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक, लेखक होते. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. ते महात्मा फुले या नावाने पण ओळखले जात होते. वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. पेशव्यांसाठी फुलांचा पुरवठा करणे आणि फुलांची आकर्षक सजावट (फुलांची आरास) करणे या व्यवसायात ज्योतिबा फुले यांचे आजोबा शेरीबा कार्यरत होते. हा व्यवसाय पुढे अनेक दशके सुरू होता. स्वतः ज्योतिराव तर फुलांच्या आणि भाजीपाल्याच्या व्यवसायात होते. यातील फुलांच्या व्यवसायामुळेच या घराण्याला फुले हे नाव पडल्याचे सांगतात. त्यांचे आधीचे आडनाव गोऱ्हे किंवा गोरे असे होते.
ज्योतिबा फुले यांनी सामाजिक प्रबोधन, महिला शिक्षण या क्षेत्रात मोठे कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना भारतातील महिला शिक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ज्योतिबा फुले यांनी आधी पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. नंतर पत्नीसोबत पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी अर्थात भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना 1888 मध्ये सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी महात्मा अर्थात महान आत्मा ही पदवी सन्मानाने बहाल केली. यानंतर ज्योतिबा फुले यांना नागरिक महात्मा फुले या नावाने ओळखू लागले.
फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी महाराष्ट्र या राज्याची ओळख सांगितली जाते. राज्याला या तीन थोर समाजसुधारकांचा वारसा लाभला. यातील पहिले समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले होते. सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळावे यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन पीडित वर्गाच्या प्रगतीसाठी काम केले.
महात्मा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे 11 एप्रिल 1827 रोजी झाला. यंदा मंगळवार 11 एप्रिल 2023 रोजी त्यांची 196 वी जयंती आहे. शेतकऱ्याचा असूड हा महात्मा फुले यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे. तत्कालीन समाजातील अनिष्ट बाबींविषयी प्रतिक्रिया या ग्रंथात उमटली आहे. याच ग्रंथात त्या काळातील शेतकऱ्यांची अवस्था तसेच या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी महात्मा फुले यांनी सुचवलेले मार्ग यांचा समावेश आहे.
कष्ट करत निष्ठेने केलेल्या संसाराला अर्थात गृहस्थाश्रमाला महात्मा फुले यांनी कायम मान दिला. महिला शिक्षण तसेच सर्व जातीधर्माच्या नागरिकांना शिक्षण यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. समाजाने महिला आणि पुरुष या दोघांनाही मानाने वागवले पाहिजे. समाजात कोणत्याही प्रकारचा भेदाभेद असणे चांगले नाही. माणसाला माणूस म्हणून जगता येणे आवश्यक आहे. प्रसंगी अडचणीत सापडलेल्याला मदतीचा हात देऊन माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून दिली पाहिजे या मताचे ते होते. परिश्रमाला (मेहनत किंवा कष्ट) आणि परिश्रम करणाऱ्याला ते मान देत. ज्योतिबांच्या सत्यशोधक समाजाने सामाजिक न्यायासाठी काम केले तसेच गुलामगिरीला विरोध केला.
भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह 10 Brand
AI ने तयार केले दिग्गजांचे सेल्फी घेतानाचे फोटो
महात्मा फुले यांचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी निधन झाले. निधनावेळी ते 63 वर्षांचे होते. पण त्यांनी केलेल्या कार्यामुळे आजही ते नागरिकांचा हृदयात अजरामर आहेत.
किती किंमतीत तयार होते बुलेटप्रूफ कार?
भारतीयांनी भारतासाठी बांधलेले नवे संसद भवन