Mahatma Gandhi Punyatithi in Marathi Speech : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचं मराठी भाषण

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jan 30, 2023 | 10:27 IST

Mahatma Gandhi punyatithi Marathi Speech : आज तारीख 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. आजच्या दिवशी आपण भाषणाद्वारे देशाचे राष्ट्रपिता यांचे स्मरण करतो. महात्मा गांधी यांना आठवत असताना आपल्या डोळ्यासमोर करो या मरो, मीठाचा सत्याग्रह, भारत छोडो, हे आंदोलन आठवतात. महात्मा गांधी यांनी आपल्या प्रत्येक भारतीयांच्या मनात अनेक बहुमुल्य विचार रुजवले आहेत. ते विचार म्हणजे अहिंसा, शांतता, सत्य. महात्मा गांधी यांनी अंहिसेच शस्त्र आत्मसात करत आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

Mahatma Gandhi Death Anniversary Marathi Speech
असं करा महात्मा गांधींजी यांच्या पुण्यतिथीचं भाषण   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता.
  • महात्मा गांधी, ज्यांना "राष्ट्रपिता" म्हणूनही ओळखले जाते.
  • सन 1883 मध्ये साडेतेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न 14 वर्षाच्या कस्तुरबा यांच्याशी करण्यात आला.

Mahatma Gandhi punyatithi Marathi Speech : आज तारीख 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. आजच्या दिवशी आपण भाषणाद्वारे देशाचे राष्ट्रपिता (father of nation) यांचे स्मरण करतो. महात्मा गांधी यांना आठवत असताना आपल्या डोळ्यासमोर करो या मरो, मीठाचा सत्याग्रह, भारत छोडो, हे आंदोलन आठवतात. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या प्रत्येक भारतीयांच्या (Indians) मनात अनेक बहुमुल्य विचार रुजवले आहेत. ते विचार म्हणजे अहिंसा (non-violence), शांतता (peace), सत्य (truth). महात्मा गांधी यांनी अंहिसेच शस्त्र आत्मसात करत आपल्याला देशाला स्वातंत्र्य (Freedom) मिळवून दिलं.अशा महान नेत्याची आपण आज 74 व्या पुण्यतिथी साजरी करत आहोत. या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींना स्मरण करत आहोत. भारतात दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस "हुतात्मा दिन" म्हणूनही साजरा केला जातो.  (Marathi speech on the death anniversary of Mahatma Gandhi Death Anniversary Marathi)

अधिक वाचा  : IND vs NZ T20I: भारतीय संघासाठी 'करा वा मरा'ची स्थिती

येथे जमलेले श्रोतेगण आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे आभार. आपण  मला आजच्या दिवशी महात्मा गांधींविषयी आपले मत मांडण्यास संधी दिली याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. सत्य आणि अंहिसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वांतत्र्य मिळवून देण्याचे कार्य महात्मा गांधी यांनी केले. साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण म्हणजेच महात्मा गांधीजी. महात्मा गांधी, ज्यांना "राष्ट्रपिता" म्हणूनही ओळखले जाते ते भारताचे राजकीय आणि आध्यात्मिक नेते होते.

जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरूष होते. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाळून हत्या केली होती. आज आपण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करत आहोत. गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता. त्याच्या वडिलांना तीन मुले होती त्यातील महात्मा गांधीजी सर्वात लहान होते.  

अधिक वाचा  : FTII, टिसमध्येही इंडिया : द मोदी क्वेश्चन'चं सादरीकरण

त्यांचे वडील, करमचंद गांधी, पोरबंदरचे काम करत होते आणि त्यांची आई पुतलीबाई एक धर्माभिमानी हिंदू स्री होत्या. पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या. ज्या नियमितपणे उपवास करत असत आणि देवाचे चिंतन करण्यात मग्न असत. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम लहान मोहनदास यांच्यावर पडला आणि याच मूल्यांनी पुढे चालून त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोहनदास स्वभावाने अहिंसा, शाकाहार आणि विविध धर्मातील मूल्यांना मानणारे होते.   

अधिक वाचा  :वीज ग्राहकांना महावितरणाकडून दरवाढीचा करंट

महात्मा गांधींना ब्रिटिश शासना विरुद्ध भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे नेता व भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. आपण गांधींजींना महात्मा, राष्ट्रपिता,  ही उपमा देतो. पण त्यांना मिळालेल्या या आदारार्थी उपमा अशाच मिळाल्या नाहीत. यासाठी त्यांनी जीवनाचे रान करावे लागले. जुलमी ब्रिटीश राजवटीविरुद्धात लढा देताना त्यांना अनेकदा तुरुंगवास करावा लागला होता. सन 1883 मध्ये साडेतेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न 14 वर्षाच्या कस्तुरबा यांच्याशी करण्यात आला. त्यानंतर सन 1887 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा अहमदाबाद हून उत्तीर्ण केली.

यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याना लंडन जाऊन बॅरिस्टर होण्याचा सल्ला दिला. वर्ष 1888 मध्ये मोहनदास युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनयेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी व बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले. जून 1891 मध्ये तीन वर्षांनी गांधीजी भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांना आपल्या आईच्या मृत्यूची सूचना मिळाली. यानंतर त्यांनी बॉम्बे येथे वकिली करणे सुरू केले. 

अधिक वाचा  : थंडी झाली कमी पण..., जाणून घ्या कसे असेल हवामान

 सन 1893 साली दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय केस ची वकिली करण्याच्या करार त्यांनी स्वीकारला. 24 वर्षाचे असताना गांधीजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले.  दक्षिण आफ्रिकेत त्यांना गंभीर वंशवाद आणि वर्णभेदाचा सामना करावा लागला. यासर्व घटनांमुळे त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण ठरल्या आणि त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण आलं. त्यानंतर त्याचा राष्ट्रपिता आणि महात्मा होण्याकडे प्रवास सुरू झाला. अर्थात त्यावेळी त्यांना आपण राष्ट्रपिता किंवा महात्मा व्हायचं आहे, हे माहिती नव्हतं. 

दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाला पाहून त्यांच्यामनात इंग्रजीशासना अंतर्गत असलेल्या भारतीयांच्या सन्मान आणि आपली स्वतःची ओळख यासंबंधित प्रश्न उठायला लागले. आणि जुलमी इंग्रजांविरुद्धात वर्ष 1914 मध्ये गांधीजी भारतात परत आले. या काळात ते एक राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध होऊन गेले होते. गांधींजींनी सत्य व अहिंसेचा चातुर्याने वापर केला.

साधी राहणी व उच्च विचार या तंत्राचा वापर करून गांधीजींनी गोरगरीब जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवले. खेड्याचा विकास, सूतकताई, स्वदेशी, दलितांचा उध्दार, स्वच्छता, स्वावलंबन याकडे त्यांनी लक्ष दिले.  महात्मा गांधी हे काही काळानंतर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व करणार्‍या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले.

अधिक वाचा  : मोठी दुर्घटना; एकाचवेळी 3 विमानांचे अपघात

1921 मध्ये त्यांना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी ब्रिटिश सरकारविरूद्ध अनेक अहिंसक मोहिमांचे नेतृत्व केले, ज्यात 1920 मध्ये असहकार चळवळ आणि 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह यांचा समावेश होता. ब्रिटिशांविरुद्धातील त्याच्या कारवायांसाठी ब्रिटीश सरकारने अनेकवेळा त्यांना अटक केली परंतु स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व ते अहिंसेच्या मार्गाने करत राहिले. 
 
महात्मा गांधींच्या अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या तत्त्वज्ञानाने जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा दिली. महात्मा गांधी यांनी चले जाव, भारत छोड़ो अशा घोषणा देत इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. त्यांचे सर्वात शेवटचे आंदोलन म्हणजे चले जावो हे या आंदोलनाने अनेकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवली होती. 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले.

भारत छोडो स्वतंत्रता आंदोलन त्या काळातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली आंदोलन बनून गेले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने स्वातंत्र्यसेनानी मारले गेले. यानंतर ब्रिटीश सरकार ने महात्मा गांधी समेत अनेक मोठमोठ्या काँग्रेसच्या नेतांना तुरुंगात टाकून दिले. परंतु भारत छोडो आंदोलनाचा भारतीय जनतेवर खूप मोठा परिणाम झाला होता.

 अधिक वाचा  : Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल रविवारचा दिवस

 गांधीजींच्या सत्य व अहिंसेपुढे मान झुकवून इंग्रजांनी हार पत्करली. सत्य व अहिंसा हाच माझा धर्म मानणाऱ्या गांधी - जींचा विजय झाला. 15 ऑगस्ट 19947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. गांधीजींचे स्वतंत्र भारत देशाचे स्वप्न साकार झाले. पण दुर्देवाने 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने त्यांच्यावर गोळ्या झाडत गांधींची हत्या केली. नवी दिल्ली येथील बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना करत असताना गोडसेने गांधीजींवर तीन गोळ्या झाडल्या. त्यात गांधीजींचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने देशाचे नुकसान झाले आणि लाखो भारतीयांनी त्यांच्यावर शोक व्यक्त केला. 

गांधीजींना मारण्याचा पहिला प्रयत्न 

महात्मा गांधीजींचं पुण्याशी वेगळं नातं आहे. महात्मा गांधी त्यांचे राजकीय गुरू, गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झालेल्या संवादावरून, त्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात बी. आर. आंबेडकर यांच्यासोबत केलेला पूना करार किंवा जानेवारी 1924 मध्ये सरकारी ससून हॉस्पिटलमध्ये महात्मा गांधी यांच्यावर  जीवनरक्षक शस्त्रक्रिया झाली होती.  
 अधिक वाचा  : सोने-चांदीच्या दरात घसरण,जाणून घ्या काय आहे Gold latest rate
 शिवाजी नगर (पुणे) येथे आज पुणे महानगरपालिकेची इमारत ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी मा. गांधी यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाला होता. गांधीजी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींसह त्यांच्या हरिजन यात्रेचा एक भाग म्हणून पुण्याच्या दौऱ्यावर होते. तो दिवस होता 25 जून 1934.  गांधीजी आणि कस्तुरबा गांधी हे पुणे नगर परिषदेच्या सभागृहात जात होते, जिथे ते काँग्रेसच्या नेत्यांसमोर भाषण करणार होते. त्यावेळी दोन सारख्या दिसणाऱ्या गाड्या कार्यक्रमस्थळी जात होत्या. त्यातील एका गाडीमध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी होते. पहिल्या कारवर बॉम्बचा हल्ला करण्यात आला. ज्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि इतर दोघे जखमी झाले होते. परंतु गांधीजी त्यात बचावले होते. 

त्यानंतर गांधींजींना मारण्याचा पुढचा प्रयत्न 30 जानेवारी रोजी दिल्ली येथे झाला. त्यात नथुराम गोडसे यशस्वी झाला आणि त्याने महात्मा गांधीजी यांची हत्या केली. गांधीजी जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, विचार प्रत्येक भारतीयास सदैव प्रेरणा देत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी