Today in History Wednesday, 17th August 2022: आज आहे इतिहासकार निनाद बेडेकर यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे इतिहासकार आणि लेखक निनाद बेडेकर यांचा जन्मदिन.
 • आजच्या दिवशी १९८२ साली जर्मनीत पहिली सीडी विकली गेली.
 • आजच्या दिवशी १९८८ साली पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणिअमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.

Today in History: Wednesday, 17th August 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.  (marathi writer ninad bedekar birth anniversary know more today in history 17th august 2022)

अधिक वाचा : Hotel Booking Tips : हॉटेल बुक करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, कमी पैशात मिळतील जास्त सुविधा

१७ ऑगस्ट घटना - दिनविशेष

 1. २००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.
 2. १९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
 3. १९९७: उस्ताद अली अकबर खान यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.
 4. १९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणिअमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
 5. १९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
 6. १९५३: नार्कोटिक्स ऍॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
 7. १९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
 8. १८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस ऍक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.

अधिक वाचा : Knotting Tie Well : टाय बांधताना चुकूनही ‘हे’ करू नका, चांगला लूकही होईल खराब 

१७ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

 1. १९७२: हबीब उल बशर - बांगला देशचा क्रिकेटपटू
 2. १९७०: जिम कुरिअर - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
 3. १९४९: निनाद बेडेकर - भारतीय इतिहासकार, लेखक (निधन: १० मे २०१५)
 4. १९४४: लैरी एलिसन - ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
 5. १९४१: भीम सिंग - भारतीय राजकारणी, खासदार आणि जम्मू आणि काश्मीरचे आमदार (निधन: ३१ मे २०२२)
 6. १९३२: व्ही. एस. नायपॉल - त्रिनिदादी लेखक - नोबेल पुरस्कार
 7. १९२६: जिआंग झिमिन - चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफचायनाचे मुख्य सचिव
 8. १९१६: डॉ. विनायक पेंडसे - ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (निधन: १९ ऑगस्ट १९७५)
 9. १९०५: शंकर गणेश दाते - ग्रंथसूचीकार (निधन: १० डिसेंबर १९६४)
 10. १८९३: मे वेस्ट - हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका (निधन: २२ नोव्हेंबर १९८०)
 11. १८८८: बाबूराव जगताप - श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक
 12. १८६६: मीर महबूब अली खान - हैदराबादचा सहावा निजाम (निधन: २९ ऑगस्ट १९११)
 13. १८४४: मेनेलेक (दुसरा) - इथियोपियाचा सम्राट
 14. १७६१: पं. विल्यम केरी - अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (निधन: ९ जून १८३४)

अधिक वाचा : Self Dependant Child : ‘या’ वयानंतर मुलांना शिकवा 5 कामं, अनेक प्रश्न सुटतील चुटकीसरशी

१७ ऑगस्ट निधन - दिनविशेष

 1. २००५: जॉन एन. बाहॅकल - हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते (जन्म: ३० डिसेंबर १९३४)
 2. १९८८: मुहम्मद झिया उल हक - पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)
 3. १९२४: टॉम केन्डॉल - ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
 4. १९०९: मदनलाल धिंग्रा - क्रांतिवीर (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)
 5. १८५०: जोस डे सान मार्टिन - पेरू देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)
 6. १३०४: गोफुकाकुसा - जपानी सम्राट

अधिक वाचा : Mixer Blade : मिक्सरच्या पात्यांची धार कमी झालीय? नो टेन्शन! करा हे घरगुती उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी