March 2023 Calendar, Hindu Festivals List : बुधवारपासून नव्या महिन्याची अर्थात मार्च 2023 या महिन्याची सुरुवात होणार आहे. मार्च महिना हा 2023 या वर्षातील तिसरा महिना आहे. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थात बजेट सेशन 24 मार्चपर्यंत आहे. या अधिवेशनात गुरुवार 9 मार्च 2023 रोजी राज्याचे बजेट (राज्याचा अर्थसंकल्प) सादर होणार आहे. अधिवेशन सुरू असतानाच गुरुवार 2 मार्च 2023 रोजी कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे मार्च महिन्याचे महत्त्व वाढले आहे. पण मार्च महिन्याचे एवढेच महत्त्व नाही तर मार्च महिन्यात अनेक व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस आहेत. जाणून घ्या मार्च 2023 या महिन्यात कोणकोणते व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस कधी आहेत. । धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म ।
जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा
अनेकांनी फेब्रुवारी 2023 संपण्याआधीच मार्च 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस, सुट्यांचे दिवस जाणून घेण्यासाठी गूगल सर्च सुरू आहे. या सर्चचा आढावा घेऊन टाइम्स नाउ मराठी आपल्यासाठी घेऊन आले आहे मार्च 2023 या महिन्याचे कॅलेंडर. या कॅलेंडरमध्ये व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस यांच्याबाबतची सविस्तर माहिती आहे.
या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान
Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय
तारीख | वार | महत्त्वाचा दिवस |
3 मार्च 2023 | शुक्रवार | आमलकी एकादशी |
6 मार्च 2023 | सोमवार | होळी |
7 मार्च 2023 | मंगळवार | धूलिवंदन |
8 मार्च 2023 | बुधवार | आंतरराष्ट्रीय महिला दिन |
11 मार्च 2023 | शनिवार | भालचंद्र संकष्टी चतुर्थी |
12 मार्च 2023 | रविवार | रंगपंचमी, यशवंतराव चव्हाण जयंती |
13 मार्च 2023 | सोमवार | श्री एकनाथषष्ठी |
15 मार्च 2023 | बुधवार | जागतिक ग्राहक दिन |
18 मार्च 2023 | शनिवार | पापमोचनी एकादशी |
21 मार्च 2023 | मंगळवार | दर्श अमावस्या, छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी |
22 मार्च 2023 | बुधवार | गुढीपाडवा, चैत्र नवरात्रारंभ |
23 मार्च 2023 | गुरुवार | अक्कलकोट स्वामी प्रकट दिन |
24 मार्च 2023 | शुक्रवार | मुस्लिम रमजान मासारंभ |
25 मार्च 2023 | शनिवार | विनायक चतुर्थी |
28 मार्च 2023 | मंगळवार | एकवीरा देवी पालखी |
29 मार्च 2023 | बुधवार | साईबाबा उत्सव प्रारंभ |
30 मार्च 2023 | गुरुवार | श्रीराम नवमी, चैत्र नवरात्र समाप्ती, गुरुपुष्यामृतयोग रात्री 10.58 पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6.10 पर्यंत, गजानन महाराज उत्सव, रामदास जयंती |
31 मार्च 2023 | शुक्रवार | साईबाबा उत्सव समाप्ती |