Margashirsha 2021 Wishes in Marathi : मार्गशीर्ष मासारंभाच्या शुभेच्छा, Wishes, Facebook मेसेज

Whatsapp Quotes on Margashirsha Guruvar 2021 in Marathi : यंदा ५ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने आपण आपल्या मित्र-मंडळींना शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

Margashirsha 2021 Wishes in Marathi
मार्गशीर्ष मासारंभाच्या शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • मार्गशीर्ष मासारंभाच्या शुभेच्छा
  • मराठी शुभेच्छा
  • फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा मराठी शुभेच्छा

Margashirsha 2021 Wishes in Marathi यंदा ५ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला (Margashirsha Guruvar) सुरुवात झाली आहे. तर मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार हा  (30 डिसेंबर) आहे. यावेळी घरोघरी महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी हे पूजन केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. 

मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरूवारी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. पहिल्या गुरूवारपासून ते चौथा गुरूवार पूर्ण होईपर्यंत महिला या दिवशी उपवास करतात. संध्याकाळी गोडाचा नैवेद्य करून उपवास सोडला जातो. या दिवशी पुजा करण्यासाठी सर्वात आधी पाटावर तांदूळ अथवा गहू पसरवून ठेवावेत. यावर एक पाण्याने भरलेला कलश ठेवा. या कलशात सुपारी, दूर्वा तसेच पैसे घालावेत. या कलशाच्या चारही बाजूला पाच प्रकारच्या झाडांची पाच पाने अथवा पाच डहाळ्या ठेवाव्यात. त्यावर नारळ ठेवावा.

या कलशाला चारही बाजूने हळदीकुंकू लावावे. या कलशासमोर लक्ष्मी मातेची तसबीर ठेवावी. पाच प्रकारची पाच फळे देवीच्या पुजेसाठी ठेवावीत. देवीला पाणी शिंपडून स्नान घालावे. त्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावावे. दिवा लावावा. फुले अर्पण करावीत. तसेच दुधाचा नैवेद्य दाखवावा. धूप-दीप दाखवावा. देवीची मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर लक्ष्मी मातेची कहाणी सांगणारे हे पुस्तक वाचावे. संध्याकाळच्या वेळेस पुन्हा देवीची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य देवीला दाखवावा. संपूर्ण कुटुंबासोबत जेवण करावे. देवीला नैवेद्य दाखवत असताना गाईसाठीही वेगळे पान काढून ठेवावे. त्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी देवीला हा नैवेद्य दाखवावा. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण  WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश, Messages, Wishes पाठवून तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा उत्साह कायम राखू शकता. यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्रं. हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Margashirsha wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी