Tourist places: भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन महाराष्ट्रात! जीव मुठीत घेऊन फिरायला येतात लोक 

लाइफफंडा
Updated May 21, 2022 | 11:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tourist places In Maharashtra | माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे, जे महाराष्ट्रात स्थित आहे. विकेंडला फिरण्यासाठी तुम्ही या जागेचा तुमच्या यादीत समावेश करू शकता.

Matheran is the smallest hill station in India
भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन महाराष्ट्रात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे.
  • माथेरान महाराष्ट्रात स्थित आहे.
  • माथेरान हे महाराष्ट्रातील टॉप हिल स्टेशन्सपैकी एक आहे.

Tourist places In Maharashtra | मुंबई : माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे, जे महाराष्ट्रात स्थित आहे. विकेंडला फिरण्यासाठी तुम्ही या जागेचा तुमच्या यादीत समावेश करू शकता. माथेरान सुमारे २,६३५ फूट उंचीवर आहे, ही निसर्गाची देणगी पाहायला मोठ्या प्रमाणात पर्यटक याला भेट देत असतात. माथेरान हे महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेले एक छोटेसे ऑफबीट हिल स्टेशन आहे. हे ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यू मालेट यांनी १८५० मध्ये विकसित केले होते. (Matheran is the smallest hill station in India). 

अधिक वाचा : 'मलिकांचे डी-गँगशी संबंध' आहेत, कोर्टाचं निरीक्षण

माथेरानचा जगभर डंका

माथेरान हे महाराष्ट्रातील टॉप हिल स्टेशन्सपैकी एक आहे, जिथे मुंबई आणि पुण्यातील लोक विकेंडच्या मुहूर्तावर या लोकप्रिय जागेला भेट देण्यासाठी येतात. या सुंदर डोंगरी शहरामध्ये आकर्षक ठिकाणांसोबतच घनदाट जंगलेही पाहायला मिळतात. लक्षणीय बाब म्हणजे माथेरानला भेट देण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगाच्या विविध भागातूनही पर्यटक येत असतात. 

आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन 

दरम्यान, माथेरानशी संबंधित सर्वात अनोखी आणि पहिली वस्तुस्थिती म्हणजे येथे कोणत्याही वाहनाला येण्यास परवानगी नाही. भारत सरकारच्या या निर्णयामागचे सोपे कारण म्हणजे या हिल स्टेशनचे वातावरण प्रदूषणमुक्त ठेवणे आणि त्यामुळेच माथेरान हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. माथेरानमधील दस्तुरी पॉइंटच्या पलीकडे कोणत्याही वाहनाला परवानगी नाही. माथेरानला जाण्यासाठी पर्यटकांना तेथून २.५ किमी अंतर पायी किंवा पोनीने कापावे लागते. 

महाराष्ट्रात एकमेव टॉय ट्रेन 

माथेरानबद्दल आणखी एक अनोखी आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे तेथील टॉय ट्रेन. सर आदमजी पीरभॉय यांनी १९०७ मध्ये बांधलेली टॉय ट्रेन नेरळ ते माथेरानपर्यंतच्या मोठ्या वनक्षेत्रात २० किमी अंतर कापते. माथेरान लाइट रेल्वे म्हणूनही प्रसिद्ध असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव टॉय ट्रेन आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही ट्रेन मे २०१६ मध्ये तात्पुरत्या वेळेसाठी स्थगित करण्यात आली होती, परंतु जानेवारी २०१८ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. टॉय ट्रेनमध्ये प्रवास करणे हा सर्वात अविस्मरणीय अनुभव आहे, महत्त्वाचे म्हणजे तु्म्ही माथेरानच्या सहलीतही याचा समावेश करू शकता. 

भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन  

माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे जे पश्चिम घाटाच्या रांगेत सुमारे ८०० मीटर उंचीवर आहे. हे हिल स्टेशन सुमारे ७ किमी क्षेत्र व्यापते आणि याची लोकसंख्या ६००० आहे. ब्रिटीशांनी ग्रीष्मकालीन रिसॉर्ट म्हणून विकसित केलेले माथेरान हे महाबळेश्वर आणि लोणावळा यांसारख्या इतर हिल स्टेशन्सप्रमाणे आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी एक शांत ठिकाण आहे. विपुल हिरवळ आणि चित्तथरारक दृश्यांमुळे माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त भेट दिलेल्या हिल स्टेशन्सपैकी एक आहे.

३५ हून जास्त पाहण्यासाठी पॉइंट 

महाबळेश्वरप्रमाणेच माथेरान देखील आपल्या अनेक प्रसिद्ध पॉइंटसाठी प्रसिद्ध आहे, जे ७ किलोमीटर एवढ्या क्षेत्रात पसरले आहे. इथे ३५ हून अधिक पॉइंट आहेत, जसे की साही पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, इको पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट, लुईसा पॉइंट, मंकी पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, रामबाग पॉइंट, हार्ट पॉइंट इत्यादी पॉइंटचा समावेश आहे. या पॉइंसवरून तुम्ही ३६० अंश कोनातले दृश्य, सूर्यास्त आणि सूर्योदय, पश्चिम घाटाची शिखरे इत्यादी पाहू शकता. 

माथेरानच्या आजूबाजूला फिरण्यासाठी जागा 

माथेरानच्या आजूबाजूला अनेक फिरण्यासाठी स्थळे पाहायला मिळू शकतात, ज्यामध्ये लुइंस पॉइंट, चार्लोट झील, शिवजी लॅडर, पॅनारोमा पॉइंट, ईको पॉइंट यांसारख्या जागांचा देखील तुम्ही माथेरानच्या ट्रिपमध्ये समावेश करू शकता. 

माथेरानला कसे जायचे 

हवाई मार्गाने - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे माथेरानसाठी जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. तुम्ही भारतात कुठूनही उड्डाण करून मुंबईला जाऊ शकता आणि नंतर रस्त्याने किंवा रेल्वेने माथेरानला जाऊ शकता. पुणे विमानतळ हे माथेरानच्या जवळचे आणखी एक विमानतळ आहे.

रेल्वेने - मुंबई आणि पुणे येथून नेरळ जंक्शनसाठी ट्रेन उपलब्ध आहेत. नेरळ ते माथेरान जाण्यासाठी टॉय ट्रेन उपलब्ध आहे. मुंबई आणि पुणे येथून टॉय ट्रेनची तिकिटे आगाऊ बुक करता येतात. अनेक एक्स्प्रेस गाड्या कर्जत येथे थांबतात, तेथून माथेरानला जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करता येतो.

रस्त्याने - मुंबई-पुणे महामार्ग आणि कर्जत मार्गे माथेरानला जाता येते. मुंबई, पुणे आणि पनवेल येथून राज्य परिवहनच्या बसेस नियमितपणे माथेरानला जातात. नेरळपर्यंत बसेस मिळू शकतात. तेथून माथेरानला जाण्यासाठी टॉय ट्रेन उपलब्ध आहे. मुंबई आणि पुणे येथूनही कॅबने प्रवास करता येतो. लक्षणीय बाब म्हणजे या शहरात कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे माथेरान पायी किंवा घोड्याच्या साहाय्याने पाहता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी