May 2022 wedding dates : मे २०२२ मधील लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी मुहूर्त

May 2022 wedding dates and shubh muhurat or muhurta list in marathi : मे २०२२ या ३१ दिवसांच्या महिन्यात लग्नाचे १८ मुहूर्त आहेत.

May 2022 wedding dates and shubh muhurat or muhurta list in marathi
मे २०२२ मधील लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी मुहूर्त  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • मे २०२२ मधील लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी मुहूर्त
 • मे महिन्यात दोन शनिवार आणि एक रविवार या दिवशी मुहूर्त
 • सोमवार १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेची सुटी

May 2022 wedding dates and shubh muhurat or muhurta list in marathi : मे २०२२ या ३१ दिवसांच्या महिन्यात लग्नाचे १८ मुहूर्त आहेत. नियंत्रणात असलेले कोरोना संकट, शाळा कॉलेजांना असलेली सुटी आणि लग्नासाठी उपलब्ध असलेले भरपूर मुहूर्त यामुळे मे महिन्यात मोठ्या संख्येने लग्नांचे आयोजन होणार आहे.

अनेकजण शनिवार किंवा रविवार या दिवशी लग्न करणे पसंत करतात. आमंत्रितांपैकी जास्तीत जास्त पाहुण्यांना लग्नाला येणे सोपे व्हावे यासाठी अनेकांचे लग्न करण्यासाठी शनिवार किंवा रविवार या दिवसांना प्राधान्य असते. या दृष्टीकोनातून बघितल्यास मे महिन्यात दोन शनिवार आणि एक रविवार या दिवशी मुहूर्त आहेत. तसेच सोमवार १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेची सुटी आहे. यामुळे १६ मे रोजी पण मोठ्या संख्येने लग्नांचे आयोजन होणार आहे. यानंतर जून २०२२ मध्ये लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी ११ मुहूर्त आहेत.

वैयक्तिक सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले असो वा नसो पण लग्नाच्या ठिकाणी मास्क घाला आणि लग्न सोहळ्याचा आनंद लुटा.

आईला द्या 'मदर्स डे'च्या शुभेच्छा

मे २०२२ मधील लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी मुहूर्त

 1. सोमवार २ मे
 2. मंगळवार ३ मे
 3. सोमवार ९ मे
 4. मंगळवार १० मे
 5. बुधवार ११ मे
 6. गुरुवार १२ मे
 7. शुक्रवार १३ मे
 8. शनिवार १४ मे
 9. रविवार १५ मे
 10. सोमवार १६ मे
 11. मंगळवार १७ मे
 12. बुधवार १८ मे
 13. गुरुवार १९ मे
 14. शुक्रवार २० मे
 15. शनिवार २१ मे
 16. गुरुवार २६ मे
 17. शुक्रवार २७ मे
 18. मंगळवार ३१ मे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी