Underwear related mistakes: अंडरवेअर हा शब्द आजही अनेकजण खुलेपणाने बोलणं टाळतात. मात्र, अंडरवेअर हे पुरुष असो किंवा महिला सर्वांच्या आरोग्याच्या संबंधित असू शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. हो... हे खरं आहे. तुम्ही कोणते इनरवेअर / अंडरवेअर परिधान करता, त्याची स्वच्छता किती आणि कशा प्रकारे राखता... या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने कोणते आजार होऊ शकतात यासंदर्भात खूपच कमी जणांना माहिती आहे. (men and women innerwear underwear related mistakes that affect on health read in marathi)
सामान्यत: लोक दिवसभर एकच इनरवेअर वापरतात. असे केल्याने घाम येतो आणि त्यामुळे खाज सुटणे, पुरळ येणे अशा समस्या उद्भवतात. तसेच त्या भागात जीवाणू वाढीला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे दिवसातून एकदा इनरवेअर बदलायला हवी.
या चुकीमुळे तुमच्या योनीमार्ग आणि लिंगाच्या भागावर परिणाम होऊ शकतो. इनरवेअर चांगल्या सूर्यप्रकाशात वाळवल्याने त्यातील ओलाव्यात असणारे जीवाणू, बुरशीजन्य प्रकार नष्ट होतात. शहरी भागात लहान घरे असतात अशा परिस्थितीत सूर्यप्रकाशात इनरवेअर न सुकवता तसेच घातल्याने तुम्हाला त्रासदायक ठरू शकते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल... पण हे खरं आहे. तुमचे डॉक्टरही तुम्हाला हे सांगतील. हे वारंवार होणाऱ्या यूटीआय आणि लघवीच्या जागी खाज सुटणे, त्या भागात पुरळ येणे अशा समस्यांपासून सुटका मिळवू शकतं. इस्त्रीमधील उष्णतेमुळे जीवाणू, बुरशी नष्ट करण्यास मदत होते.
इनरवेअरच्या स्वच्छतेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कपडे धुत असताना साबण किंवा डिटर्जंटचे कण कपड्याला चिकटू नयेत याचीही काळजी घ्या. कारण यामुळे चिडचिड होऊ शकते तसेच तुम्हाला खाज सुद्धा सुटू शकते. त्यामुळे इनरवेअर स्वच्छ पाण्याने नीट धुवाव्यात.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)