Relationship Tips । मुंबई : नातं हे खूप नाजूक असते. त्यामुळे एखाद्या नात्यात कोणती गोष्ट कधी खटकेल याचा अंदाजही लावता येत नाही, मात्र यामुळे नात्यात दुरावा वाढून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असते. केवळ कुटुंबातील सदस्यांसोबतच नाही तर प्रियकर-प्रेयसी किंवा पती-पत्नीमध्येही अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे नात्यात दुरावा येतो. लक्षणीय बाब म्हणजे हे देखील आवश्यक नाही की प्रत्येक वेळी पत्नी बरोबर आणि नवरा चुकीचा असतो, काहीवेळा कारणीभूत असतात त्या म्हणजे सवयी. पुरुषांना देखील स्त्रियांच्या काही सवयी आवडत नाहीत ज्या त्यांना सहन होत नाहीत. अशा वेळी जर तुमचा पार्टनरही तुमच्या काही सवयींमुळे नाराज असेल, तर त्यांनी लगेच त्या बदलण्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावर कामही केले पाहिजे. (Men get irritated by these major habits of women).
अधिक वाचा : आज आणि उद्या या शहरात बंद राहणार बॅंका
या आधुनिक युगात कितीही बदल झाले असले तरी काही गोष्टी पुरुषांमध्ये जन्मजात असतात. उदाहरणार्थ, पुरुषांना स्त्रियांनी प्रत्येक गोष्टीत बोलणे किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवणे अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत जर महिला त्यांच्यावर जास्त वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा नात्यातून बाहेर पडण्यासाठी पुरुष निमित्त शोधत राहतात.
असे म्हटले जाते की जर एखादी तिसरी व्यक्ती जोडप्याचा हेवा करत असेल तर ते एकमेकांवर खूप प्रेम करत असतात. मात्र या जळण्याच्या वृत्तीची भावना संशयात बदलू लागली तर नाते बिघडते. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर किंवा पतीवर जास्त संशय घेत असाल तर काही काळानंतर ही सवय तुमच्या नात्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
अनेक वेळा स्त्रियांना असे वाटते की जर त्यांनी आपल्या जोडीदाराकडे किंवा पतीकडे दुर्लक्ष केले तर ते त्यांच्या मागे लागतील पण ते काही दिवसांसाठीच चांगले वाटते. कधी कधी हीच विचारसरणी किंवा सवय नात्यात दुरावण्याचे कारण बनते.
अनेक वेळा महिला आपल्या जोडीदाराच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त प्रमाणात डोकावून पाहत असतात. ज्यामुळे दोघांचेही नाते लवकर तुटण्याची संभावना असते. लक्षणीय बाब म्हणजे तुम्हाला देखील याचा प्रत्यय पाहायचा असेल तर तुमच्या नवऱ्याचा मूड आणि वातावरण दोन्ही पाहा आणि निवांत विचार करा.