Mobile In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे तब्येतीसाठी घातक

Mobile Side Effects: काही जण टॉयलेटला जाताना मोबाईल सोबत घेऊन जाऊ लागले आहेत. हा मोबाईलच्या वापराचा अतिरेक म्हणता येऊ शकतो.

Mobile In Toilet
Mobile In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे तब्येतीसाठी घातक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Mobile In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे तब्येतीसाठी घातक
  • जर्म्स आणि बॅक्टेरिया मोबाईलच्या स्क्रीनवर सहज वास्तव्य करू शकतात
  • मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाण्याची सवय हानीकारक

Mobile Side Effects: स्मार्टफोन हा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. उठल्यापासून झोपेपर्यंतच्या काळात वारंवार अनेकजण मोबाईल बघतात, मोबाईलचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर करतात. मोबाईल सोबत नाही अशा अवस्थेत जगणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. काही जण तर टॉयलेटला जाताना पण मोबाईल सोबत घेऊन जाऊ लागले आहेत. हा मोबाईलच्या वापराचा अतिरेक म्हणता येऊ शकतो. पण काही जण हा प्रकार करू लागले आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करणे तुमच्याच तब्येतीला हानीकारक ठरू शकते?...

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

टॉयेलटमध्ये अनेक हानीकारक जर्म्स, बॅक्टेरिया असतात. याच कारणामुळे टॉयलेटमधून आल्यावर हातपाय साबण आणि पाणी वापरून स्वच्छ धुतात. काही जण तर टॉयलेटमधून आल्यावर आंघोळ करणे पसंत करतात. आरोग्याच्या हितासाठी टॉयलेटमधून आल्यावर स्वच्छता आवश्यक आहे. पण या वास्तवाकडे दुर्लक्ष करून काही जण टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जातात आणि तिथे पण मोबाईलचा वापर करणे पसंत करतात. 

मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाण्याची सवय हानीकारक ठरू शकते. टॉयलेटमधील हानीकाक जर्म्स आणि बॅक्टेरिया मोबाईलच्या स्क्रीनवर सहज वास्तव्य करू शकतात. हे हानीकारक जर्म्स आणि बॅक्टेरिया मोबाईलच्या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्या शरीरात पोहोचू शकतात. टचस्क्रीन असल्यामुळे मोबाईल हाताळताना वारंवार स्क्रीनला स्पर्श करावा लागतो. याच हातांनी आपण जेवतो. यामुळे टॉयलेटमधील हानीकाक जर्म्स आणि बॅक्टेरिया मोबाईलमुळे शरीरापर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 

हानीकाक जर्म्स आणि बॅक्टेरिया तब्येतीच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. लक्षात ठेवा टॉयलेटमध्ये टॉयलेट सीट, टॉयलेट पेपर अशा सर्व ठिकाणी हानीकाक जर्म्स आणि बॅक्टेरिया असतात. यामुळेच टॉयलेटमधून आल्यावर प्रत्येकजण हातपाय स्वच्छ धुतो. पण टॉयलेटमध्ये जाताना सोबत नेलेला मोबाईल आपण धुवू शकत नाही. मोबाईल हाताळताना जे हात वापरले जातात तेच हात जेवणासाठी पण वापरले जातात. याच कारणामुळे डॉक्टर टॉयलेटमध्ये मोबाईल सोबत नेऊ नका असे सांगतात. 

मोबाईल टॉयलेटमध्ये नेणे म्हणजे स्वतःच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे, असे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. टॉयलेट ही मोबाईल सोबत नेण्याची जागा नाही. कोणत्याही नागरिकाने टॉयलेटमध्ये मोबाईल नेऊ नये असे डॉक्टर सांगत आहेत. 

काही जण टॉयलेट सीटवर बसून दीर्घ काळ मोबाईल हाताळत बसतात. यातून शरीराच्या विशिष्ट भागातील मांसपेशी शिथील होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच मोबाईलच्या माध्यमातून हातापर्यंत आणि तिथून पुढे शरीरात हानीकारक जर्म्स आणि बॅक्टेरिया पोहोचण्याचाही धोका आहे. यामुळे टॉयलेटमध्ये मोबाईल नेऊ नये असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॉयलेट सीटवर बसून मोबाईलमध्ये वेळ घालवताना काही जण विनाकारक जोर काढतात. यामुळे शरीरातील काही स्नायूंवर अनावश्यक ताण पडून त्यांच्या कामावर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळे टॉयलेटमध्ये मोबाईल घेण्याची सवय तब्येतीसाठी हानीकारक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी