8 wives : आठ बायकांसोबत सुखानं राहण्यासाठी तो बांधतोय घर, खवळलं शेजाऱ्यांचं पित्त

एका मॉ़डेलनं 8 बायकांसोबत लग्न केलं असून सगळे आनंदात राहतात. त्यांनी नुकतीच नवी जागा घेऊन तिथं घर बांधायला सुरुवात केली आहे. मात्र शेजाऱ्यांचा याला विरोध आहे.

8 wives
आठ बायकांसोबत सुखानं राहण्यासाठी तो बांधतोय घर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मॉडेलने केलीत 8 लग्न
  • सर्वांसोबत राहतो सुखात
  • शेजाऱ्यांचं खवळलं पित्त

8 wives : आपल्या आठ बायकांसह (8 wives) सुखानं राहण्यासाठी एकानं अलिशान घर (lavish home) बांधायला सुरुवात केली आहे. आपल्या घराचं नाव त्याने mansion of free love असं ठेवलं आहे. या घराचं बांधकाम सध्या सुरु असून आजूबाजूच्या नागरिकांना मात्र त्याची ही संकल्पना झेपलेली नाही. एका व्यक्तीने एकच लग्न करण्याचा कायदा असताना ही व्यक्ती आठ बायकांसोबत कशी काय राहू शकते, असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला असून त्याला शक्य त्या सर्व प्रकाराने त्रास देण्याचा प्रयत्न आजूबाजूचे नागरिक (Neighbours) करत असल्याचं चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणानेही आपला इरादा अधिक पक्का केला असून आपल्याला आपल्या कायदेशीर जागेतून कुणीच हाकलून देऊ शकत नसल्याचं म्हणत तिथेच राहण्याचा निर्धार त्याने केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

केली आठ लग्नं

ही घटना आहे ब्राझीलमधील. आर्थर ओ उर्सो नावाचा तरुण मॉडेल आणि इन्फ्फुएन्सर आहे. आपल्याला लहानपणापासूनच अनेक लग्न करण्याची इच्छा असल्याचं तो सांगतो. त्याने आतापर्यंत नऊ महिलांसोबत लग्न केलं असून सर्वांनी एकत्र राहण्यावर त्याचा विश्वास आहे. एक व्यक्ती एका वेळी अनेक महिलांसोबत आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहू शकते, हे आपण सिद्ध केल्याचं त्याचं म्हणणं आहे. आपल्याला आपल्या बायकांसोबत राहायला आवडतं आणि त्यांनाही आपल्यासोबत राहायला आवडतं. असं असताना इतर कुणी याला आक्षेप घेण्याचा संंबंधच येत नाही, असा त्याचा दावा आहे. 

अधिक वाचा - Happy Life: या बदलांमुळे आयुष्य होईल आनंदी, सुखी जीवनाचे 8 सोपे मंत्र

सर्वांसाठी बांधतोय घर

सर्वांना आनंदाने आणि आरामात राहता यावं, यासाठी त्याने एक प्लॉट खरेदी केला असून त्यावर घर बांधण्याचं काम सुरू आहे. प्राथमिक बांधकाम पूर्ण झालं असून इतर डागडुजीची कामं सध्या सुरु आहेत. त्यामुळे सध्या आर्थर याच घरात राहतो. 

शेजारी देतात त्रास

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

कायद्याने ब्राझीलमध्ये एक व्यक्ती एकच लग्न करू शकते. असं असताना आठ बायकांसोबत राहणाऱ्या आर्थरला स्थानिकांनी विरोध केला आहे. आमच्या भागात तू राहायला येऊ नकोस, अशी तंबीच शेजाऱ्यांनी त्याला भरली आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या घराच्या भिंतीवर Demon असं लिहिण्यात आलं होतं. त्याचा अर्थ आहे राक्षस. शेजाऱ्यांनी लिहिलं होतं की तू राक्षस आहेस. राक्षसाने आपलं कुटुंब घेऊन इथून निघून जावं. आम्ही तुमचं अजिबातच स्वागत करत नाही. 

अधिक वाचा - Today in History Monday, 22nd August 2022: आज आहे प्रसिद्ध लेखक अनंतमूर्ती यांची पुण्यतिथी, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आर्थरला हवीय शांती

आपल्याला आता संघर्ष करण्यात रस नसून केवळ शांती हवी आहे, असं त्यानं म्हटलं आहे. सकाळी बांधकाम कामगारांसाठी दरवाजा उघडताना बाहेरच्या भिंतीवर लिहिलेला हा निरोप त्याने वाचला. त्यानंतर स्वतः ओलं फडकं घेऊन तो भिंत साफ करू लागला. आपण कुणाच्याही दबावाला बळी पडणार नसल्याच संदेश त्याने दिला आहे. 

कुटुंब राहतं आनंदात

सर्व महिलांशी आपण प्रतिकात्मकरित्या लग्न केलं असून सगळे आनंदात असल्याचं त्याने म्हटलं आहे. आपल्या सोशल मीडियावरून तो सर्वांसोबतच्या वेगवेगळ्या क्षणांचे फोटो अपलोड करत असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी