Astro Tips For Money: रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये करा 'हे' काम, तिजोरीत कधीही होणार नाही खडखडाट

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Sep 19, 2022 | 15:50 IST

Vastu Tips For Money: वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रात अशी काही उपाय सांगितली आहेत, जी केल्याने घरात आशीर्वाद राहतात. रात्री झोपण्यापूर्वी हे काम केल्याने घर धन आणि सुखाने भरते.

Vastu Tips For Money
पैसे मिळविण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम 
थोडं पण कामाचं
  • जीवनात प्रगती आणि सुख-समृद्धीसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी होत असतील तर त्यामागे कुंडलीतील ग्रह दोष किंवा घरातील वास्तुदोष असू शकतात.
  • या वास्तू टिप्स आणि खगोल टिप्स पाळल्या गेल्या तर काही दिवसातच त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर, प्रगतीवर आणि आर्थिक स्थितीवर स्पष्टपणे दिसून येतो.
  • दररोज रात्री झोपण्यापूर्वी पालन केल्यास खूप प्रभावी परिणाम मिळतात.

मुंबई:  Money Tips in Marathi: प्रत्येक व्यक्तीला वाटते की तिच्या घरात नेहमी धनसंपत्ती( money) भरलेली असावी. आलिशान जीवन (luxurious life) , आलिशान घर (luxurious house), कार (car) आपल्याकडे असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच लक्ष्मी मातेचा(laxmi mata) आशीर्वाद कायम राहावा. यासाठी खूप मेहनतही करतात. मात्र खूप पैसे कमावणे आणि मेहनत करूनही अनेकांकडे आर्थिक समस्या जाणवत असते. जीवनात प्रगती आणि सुख-समृद्धीसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी होत असतील तर त्यामागे कुंडलीतील ग्रह दोष किंवा घरातील वास्तुदोष असू शकतात. अशा नकारात्मक परिस्थिती टाळण्यासाठी वास्तु आणि ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.

या वास्तू टिप्स आणि खगोल टिप्स पाळल्या गेल्या तर काही दिवसातच त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर, प्रगतीवर आणि आर्थिक स्थितीवर स्पष्टपणे दिसून येतो. पैसे मिळवण्यासाठी अशा काही वास्तु आणि खगोल टिप्स आहेत, ज्याचे दररोज रात्री झोपण्यापूर्वी पालन केल्यास खूप प्रभावी परिणाम मिळतात. यासोबतच हे उपाय घरामध्ये सकारात्मकता आणि आनंदाने भरून जातात. 

अधिक वाचा-  भारतात 'या' शहरात मिळतं सर्वात Best Food, एकदा तरी घ्या आस्वाद

पैसे मिळविण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा हे काम

घराचा प्रत्येक भाग महत्त्वाचा असतो आणि या ठिकाणी निर्माण झालेल्या वास्तुदोषांमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. त्यांच्यामुळे पैशाची हानी, गरिबी, घरात अशांतता निर्माण होते. हे वास्तू दोष दूर करून आणि काही उपाय करून आर्थिक स्थिती सुधारता येते.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली ठेवा. याने अनेक वास्तू दोष दूर होतात आणि घरात सदैव आशीर्वाद राहतो. पैशांची कधीही समस्या उद्धभवत नाही. 

त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याची भांडी रिकामी ठेवू नका. रात्री पाण्याची भांडी नेहमी भरून ठेवावीत. शक्य असल्यास संध्याकाळी त्यांच्या जवळ दिवा लावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि घरात सदैव समृद्धी राहते.

रात्री नेहमी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि घर नेहमी ऐश्वर्याने भरलेले असते.

अधिक वाचा-  जान्हवी कपूरचा डीप नेक ड्रेस Look लावेल तुम्हाला वेड 

दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. शक्य असल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावा, यामुळे माता लक्ष्मी घरात नेहमी वास करते आणि कधीही पैशाची कमतरता भासू देत नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी