भारताला कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारी स्मारके

Monuments that earn India billions of rupees : भारतातील १०० पेक्षा जास्त पर्यटनस्थळे अशी आहेत ज्यांच्या प्रवेश शुल्कातूनच देशाला कोट्यवधी रुपयांची कमाई होत आहे. प्रवेशशुल्कातून मोठे उत्पन्न मिळवून देणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये प्रामुख्याने देशातील स्मारकांचा समावेश होतो.

Monuments that earn India billions of rupees
भारताला कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारी स्मारके  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारताला कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारी स्मारके
  • प्रवेशशुल्कातून मोठे उत्पन्न मिळवून देणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये प्रामुख्याने देशातील स्मारकांचा समावेश
  • उत्तर भारतातील स्मारकांची संख्या लक्षणीय

Monuments that earn India billions of rupees : वाजवी दरात विमान प्रवास करणे शक्य झाल्यामुळे भारतातील पर्यटनात वाढ होऊ लागली आहे. कोरोना नियंत्रणात असल्याचाही देशाच्या पर्यटन व्यवसायाला लाभ होऊ लागला आहे. भारतातील १०० पेक्षा जास्त पर्यटनस्थळे अशी आहेत ज्यांच्या प्रवेश शुल्कातूनच देशाला कोट्यवधी रुपयांची कमाई होत आहे. प्रवेशशुल्कातून मोठे उत्पन्न मिळवून देणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये प्रामुख्याने देशातील स्मारकांचा समावेश होतो. यातही उत्तर भारतातील स्मारकांची संख्या लक्षणीय आहे. जाणून घेऊ या ऐतिहासिक स्मारकांविषयी...

फेवरेट डेस्टिनेशन

  1. ताजमहाल Taj Mahal : जगातील सात आश्चर्यांमध्ये ताजमहाल या वास्तूचा समावेश होतो. बादशहा शहाजहाँ याची पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा असे ताजमहालचे वर्णन केले जाते. हे स्मारक यमुना नदीच्या किनाऱ्यावर आहे. हे स्मारक बघण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. यात भारतीयांप्रमाणेच विदेशी पर्यटकही असतात. प्रवेशशुल्काचे पैसे मोजून पर्यटक ताजमहाल बघतात यामुळे ताजमहालच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई होते.
  2. लाल किल्ला Red Fort : दिल्लीचा लाल किल्ला हा मोगल बादशहा शहाजहाँ याच्या कार्यकाळात बांधण्यात आला. यथावकाश इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. स्वातंत्र्यानंतर किल्ल्याचा ताबा भारत सरकारकडे आला. युनेस्कोने सांस्कृतिक वारसा म्हणून लाल किल्ल्याला विशेष दर्जा दिला. चांदणी चौक परिसराजवळ असलेला हा लाल किल्ला बघण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक देशाविदेशातून येतात.
  3. कुतुब मीनार Qutub Minar : इंडो इस्लामिक वास्तूशैलीतील कुतुब मीनार हे एक अद्भूत स्मारक आहे. जगातील सर्वात उंच मीनार असे कुतुब मीनारचे वर्णन केले जाते. कुतुब उद दीन ऐबकने तेराव्या शतकात या वास्तूचे बांधकाम सुरू केले असे म्हणतात. मीनार दिल्लीच्या महरौली परिसरात आहे. हा दिल्लीचा प्राचीन आणि पॉश परिसर आहे.
  4. हुमायूनचा मकबरा Humayun Tomb : दुसरा मोगल बादशहा हुमायून याचे तसेच त्याच्य कुटुंबातील इतर सदस्यांचे पार्थिव सुरक्षित ठेवण्यासाठी या मकबऱ्याची निर्मिती करण्यात आली. याच वास्तूमुळे ताजमहाल बांधण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणतात. 
  5. आग्य्राचा किल्ला Agra Fort : आग्य्राचा किल्ला किंवा आग्य्राचा लाल किल्ला हा ताजमहाल एवढा लोकप्रिय नसला तरी दरवर्षी लाखो पर्यटक हा किल्ला बघण्यासाठी येतात. हा राजपूत राजाने बांधलेला आणि पुढे मोगलांच्या ताब्यात गेलेला किल्ला. किल्ल्याच्या काही भागांची रचना नव्याने करण्यात आली. या रचनेत मोगल वास्तूकलेचा प्रभाव दिसतो. पण पुढे अकबर बादशहाने मोगलांची राजधानी आग्रा येथून कायमची दिल्लीत नेली. पण पर्यटनस्थळ म्हणून आग्य्राचा किल्ला आजही लोकप्रिय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी