Bihar Sperm Bank : नवरा देऊन जातो स्पर्म, बायको होते गर्भवती; बिहारमध्ये येतोय अनोखा ट्रेंड

आपला वंश वाढावा, अशी अनेक पुरुषांची इच्छा असते. मात्र आयुष्यातील अनिश्चिततेमुळे मूल होईपर्यंत आपण जगू का, अशी शंकाही असते. यावर बिहारच्या तरुणांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तर शोधलं आहे.

Bihar Sperm Bank
तरुणांमध्ये स्पर्म प्रिझर्व्हेशनचा ट्रेंड  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • बिहारमध्ये नवा ट्रेंड
  • देशाबाहेर जाण्यापूर्वी तरुण करतायत स्पर्म प्रिझर्वेशन
  • महिलांमध्ये 'एग प्रिझर्वेशन'चा ट्रेंड

Bihar Sperm Bank | लग्नानंतर एका तरुणाला परदेशी जावं लागतं. पुढची पाच वर्षं आपल्याला परत येता येणार नाही, याची त्याला कल्पना असते. पाच वर्षांनी तो घरी परत येतो आणि आपल्या तीन वर्षांच्या मुलाला भेटतो. पुढची पाच वर्षं आपण परत येऊ शकणार नाही,याची कल्पना असल्यामुळे त्याने आपले स्पर्म बँकेत जमा केलेेले असतात. ठऱलेल्या फॅमिली प्लॅनिंगनुसार पत्नी स्पर्म बँकेत जाते. डॉक्टरांच्या मदतीने पतीचे स्पर्म ती कन्सिव्ह करते आणि प्रेग्नंट राहते. परदेशी गेल्यावर एका वर्षाने त्याला ‘गुड न्यूज’ समजते आणि लवकरच बाळाला भेटण्याच्या स्वप्नात तो रंगून जातो. नऊ महिन्यांनी मूल होतं पण तरीही त्याला आणखी तीन वर्ष प्रतिक्षा करावी लागते. मूल तीन वर्षांचं झाल्यावर बापलेकाची भेट होते. 

दुसरी घटना. एका सैनिकाचं लग्न होतं. लग्नानंतर काही दिवसांतच त्याला ड्युटीवर रुजू व्हायचं असतं. तो स्पर्म बँकेत जातो आणि आपले स्मर्म प्रिझर्व्ह करून ठेवतो. काश्मीरमध्ये पोस्टिंग असल्यामुळे कायमच आपल्या जीवाला धोका असणार, हे त्यानं गृहित धरलेलं असतं. आपलं काही बरंवाईट झालं तरी आपलं मूल या जगात यावं, अशी त्याची मनोमन इच्छा असते. त्याची पत्नी ठरलेल्या वेळी स्पर्म बँकेत जाते आणि शास्त्रोक्त पद्धतीने स्पर्म कन्सिव्ह करून प्रेग्नंट राहते. 

अधिक वाचा - What do Married Women Search the Most on Google: लग्न झालेला महिला गुगलवर काय शोधतात? वाचा सविस्तर 

बदलता बिहार

या कथा आहेत बदलणाऱ्या बिहारमधील. बिहारमध्ये सध्या असे 5 हजार तरुण आहेत, जे कामानिमित्त बिहारच्या बाहेर आहेत, पण जाण्यापूर्वी त्यांनी स्पर्म बँकेत आपले स्पर्म देऊन ठेवले आहेत. बिहारमध्ये गेल्या काही महिन्यांत अचानकपणे स्पर्म बँकेचा व्यवसाय वाढू लागला आहे. 

महिलाही करतायत ‘एग प्रिझर्वेशन’

पुरुषांप्रमाणे महिलाही आता एग प्रिझर्वेशन करत आहेत. अर्थात, महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी म्हणजे केवळ 10 टक्के आहे. यात करिअरला अधिक महत्त्व देणाऱ्या महिला आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या आजारांमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्यामुळे अगोदरच एग प्रिझर्वेशन करण्याकडे महिलांचा कल वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी पटनात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. त्यावरील उपचारांदरम्यान महिलेच्या मूल जन्माला घालण्याच्या क्षमतेवर परिणाम होणार असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर महिलेनं स्पर्म बँकेत जाऊन कॅन्सरवरील उपचार सुरू होण्यापूर्वीच एग प्रिझर्वेशन केलं. तीन वर्षांच्या उपचारानंतर ती कॅन्सरमधून बरी झाली आणि मग स्पर्म बँकेतून भ्रूण तयार करून आई झाली. 

अधिक वाचा - Relationship Tips : जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडण करण्याऐवजी या टिप्स आणा अंमलात...

तरुणांचा वाढता प्रतिसाद

सैन्यात दाखल होणारे आणि परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांचा स्पर्म प्रिझर्व्ह करण्याकडे सर्वाधिक ओढा असल्याचं दिसून आलं आहे. आपल्या जीवाचं बरंवाईट झालं तर आपला वंश कसा वाढणार, याची चिंता असल्यामुळेच स्पर्म प्रिझर्व्ह करण्याचा ट्रेंड वाढत असल्याचं समाजशास्त्रज्ञ सांगत आहेत. 

हे स्पर्म उणे 196 अंशापर्यंतच्या तापमानात जतन केले जातात आणि कित्येक दशकं हे स्पर्म आहे त्याच अवस्थेत साठवून ठेवता येऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी