Mother's Day 2022 Date in India: मुंबई : जगातील सर्वात पवित्र नाते म्हणजे आई आणि मुलाचे. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती लहानच असतात. आईचे हे रूप शब्दांत व्यक्त करता येत नाही. आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी किती जणांनी कविता आणि साहित्य निर्मिती केली आहे. आज ८ मे आहे आणि ८ मे हा जागतिक स्तरावर मदर्स डे म्हणजेच मातृदिन म्हणून साजरा केला जातो. पण मदर्स डे कधीपासून साजरा केला जातो? त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि इतिहास काय आहे आज जाणून घेऊया
मदर्स डे म्हणजेच जागतिक मातृदिन दर वर्षी मे महिन्यातील दुसर्या रविवारी साजरा केला जातो. संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा केला जातो. यंदा मे महिन्यातील दुसरा रविवार ८ तारखेला आहे. या वर्षी ८ मे २०२२ रोजी मातृदिन साजरा केला जाईल. काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार साल १९१४ पासून मातृदिन साजरा केला जातो.
ऍना जार्विस या अमेरिकन महिलेने पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यास सुरूवात केली. ऍनाला आपल्या आईविषयी अत्यंत प्रेम आणि आदर होता. जेव्हा ऍनाच्या आईचे निधन झाले तेव्हाअ ऍनाने आपले संपूर्ण आयुष्य आपल्य आईला समर्पित केले. आपल्या आईच्या निधनानंतर ऍनाने मदर्स डे साजरा करण्यास सुरूवात केली. युरोमध्ये हा दिवस मदरिंग संडे नावाने साजरा केल जातो.
अमेरिकचे तत्कालीन राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी ९ मे १९१४ हा दिवस मदर्स डे साजरा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अमेरिकेत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी मदर्स डे सारजा केला जाईल असा कायदा अमेरिकेच्या संसदेत पारित करण्यात आला. त्यानंतर युरोप खंडातील देश आणि भारतातही हा मातृदिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.