Motivational Quotes in Marathi: या प्रेरणादायी विचारांनी करा दिवसाची सुरुवात, आयुष्यात होईल भरभराट

Motivational Quotes in Marathi: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या ध्येयाच्या थोडे जवळ पोहोचायला हवे. यासाठी दिवसाची सुरुवातच प्रेरणादायक अशा विचारांनी होणे गरजेचे आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला मराठीत काही प्रेरणादायक सुविचार सांगणार आहोत.

Motivational Quotes in Marathi:Positive quotes, Inspiring Quotes
Marathi Motivational Status: या प्रेरणादायी विचारांनी करा दिवसाची सुरुवात, आयुष्यात होईल भरभराट 
थोडं पण कामाचं
  • प्रेरणादायक अशा विचारांनी करा दिवसाची सुरुवात
  • प्रेरणादायक विचारांनी दिवसाची सुरुवात केल्या कधीही येणार नाही नैराश्य
  • वाचा प्रेरणादायक असे 50 मराठी सुविचार

Motivational Quotes in Marathi: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन फार महत्त्वाचा असतो. त्यासोबतच मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा सुद्धा मिळणे गरजेचे असते. दररोज दिवसाची सुरुवात प्रेरणादायक विचारांनी केल्यास तुम्हाला कोणतेही काम करण्यात अडचण येणार नाही आणि तुम्ही नैराश्यात जाणार नाहीत. तुम्ही सकारात्मक पद्धतीने दिवसाची सुरुवात कराल. तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर तुम्हाला सकारात्मक विचारसरणीकडे तुमचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला प्रेरणादायक असे काही मराठी सुविचार सांगणार आहोत ज्याने तुम्ही दिवसाची सुरुवात केल्यास तुम्ही कोणत्याही कामाची सुरुवात सकारात्मक दृष्टीनेच कराल. (50 Motivational Quotes to inspire you to positive start your day read in Marathi)

इंटरनेट, सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही प्रेरणादायक मेसेज सांगणार आहोत. यामुळे तुमचा यशाचा मार्ग सुकर होईल. (Motivational quotes suvichar in marathi for success in life)

50 प्रेरणादायक विचार (50 Motivational Quotes in Marathi)

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे

आणि हराल तर असे हरा की 

जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा, 

शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,

स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत

सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या नैराश्ये नंतरच मिळत असते.

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही.

पराभवाची भीती बाळगू नका, एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.

 

नेहमी लक्षात ठेवा... आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

हे पण वाचा : Yearly Horoscope 2023: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल नवे वर्ष, वाचा

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात

 

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय... डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..

 

भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

 

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

 

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.

हे पण वाचा : कोणतीही व्यक्ती अविवाहित का असते? जाणून घ्या कोणती रास काय सांगते

जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तिच खरी वेळ असते, नवीन काहीतरी सुरु होण्याची.

 

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.

 

जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.

 

रस्ता सापडत नसेल तर स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

 

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल

 

हिंमत एवढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल

हे पण वाचा : Pune: वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी पुण्याजवळील प्रसिद्ध ठिकाणे

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात, ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

 

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात,

एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

 

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

 

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण 

बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात

 

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा

 

विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

हे पण वाचा : लैंगिक संबंध ठेवताना महिला खोटं का बोलतात? वाचा

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

 

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

 

ज्याच्याजवळ उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही.

 

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

 

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती कशी झोपते? तुमची रास कोणती?

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,

दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

 

आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.

 

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते

 

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे

 

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो

हे पण वाचा : Vastu Tips: घरात कबूतर येणे शुभ की अशुभ? वाचा

रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात.

स्वप्न बघत परत झोपा नाहीतर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागा

 

जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका.

कारण हा निसर्गाचा नियमच आहे.

ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात.

 

या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं

 

आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं.

यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे

हे पण वाचा : अंकशास्त्र : 2023 वर्ष तुमच्यासाठी कसे असणार?

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

 

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,

तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

 

गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं.

 

एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल

 

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते

 

माझ्यामागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही,

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

 

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर चाली रचत राहाव्या लागतात

हे पण वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कधी आणि कोणत्या महिन्यात लग्न करावे? वाचा

हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.

 

चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी,

तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.

 

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य

आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य!

 

जितकी प्रसिद्धी मिळवाल, तितकेच शत्रू निर्माण कराल,

कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील.

 

जेवढं मोठं आपले ध्येय असते, तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी