National Best Friends Day 2021 Marathi Wishes: नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे निमित्त मराठी शुभेच्छा

National Best Friends Day 2021 Marathi Wishes: नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे निमित्त आपल्या मित्रपरिवाला Images, Wishes,Greetings Quotes on Friendship, WhatsApp Messages and HD Wallpapers पाठवून दया शुभेच्छा 

national best friends day 2021 Marathi wishes best wishes to your best friend  by sending images wishes greetings quotes on friendship whatsapp messages and hd wallpapers
नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे निमित्त मराठी शुभेच्छा 

थोडं पण कामाचं

  • मैत्रीला कोणत्याही एका दिवसात बांधता येत नाही.
  • आपल्या आवडत्या आणि बेस्ट फ्रेंडसाठी एक दिवस खास असतो.
  • जो आपण त्याच्यासोबत आनंदाने सेलिब्रेट करू शकतो. 

National Best Friends Day Marathi Wishes : प्रत्येक वर्षी देशात ८ जूनला राष्ट्रीय जीवलग मैत्री दिन (National Best Friends Day) म्हणून साजरा केला जातो.  पुराण काळापासून बेस्ट मैत्रीच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. जीवाला जीव देणारे मित्र आपल्या मैत्रीसाठी कोणत्याही अडचणींचा सामना करायला तयार होता. आपल्या मित्राला आपली गरज आहे या हेतूने ते आपले सर्वस्व अर्पण करायला तयार असतात. मित्र चुकीच्या मार्गाला जात असेल तर त्याचा कान पकडून ते पुन्हा सरळ मार्गावर आणतात. आपल्या मित्राचे कोणतेही नुकसान होऊ नये साठी सदैव प्रयत्नशील असतात. 

आनंद मित्रांबरोबर सेलिब्रेट केला जातो, अशा परिस्थितीत मैत्री ही जीवनाची अमूल्य भेट आहे, जी खऱ्या अर्थाने जीवन जगण्यास शिकवते. आयुष्यातील आनंद आणि दु: खाचे महत्त्वपूर्ण क्षण मित्रांसोबत घालवले जातात, जीवनाच्या सुवर्ण आठवणींच्या रूपात ते आपल्याबरोबर नेहमी राहतात


या खास दिवसासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा, Images, Wishes,Greetings Quotes on Friendship, WhatsApp Messages and HD Wallpapers आणि बरेच काही घेऊन आलो आहोत ज्याच्या सहाय्याने आपण या दिवशी आपल्या मित्रांना शुभेच्छा देऊ शकता.

मराठी शुभेच्छा (National Best Friends Day Marathi Wishes) 

लोक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत.
Happy Best Friends Day

..............

मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा
कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
Happy Best Friends Day

मैत्री ही प्रेमापेक्षाही सुंदर आहे.
Happy Best Friends Day

...............

एका मित्रासोबत अंधारात चालणे,
एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.
Happy Best Friends Day

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो
Happy Best Friends Day

.....................

जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,
काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,
पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.
Happy Best Friends Day
निखळ मैत्रीचे धन असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात
Happy Best Friends Day

हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका शब्दात कळणं म्हणजे मैत्री
Happy Best Friends Day

मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं
Happy Best Friends Day

किती कमाल असते ना ही मैत्री,
वजन तर असतं… मात्र ओझं असतं नसतं.
Happy Best Friends Day


आयुष्य अधिक चांगले ठेवण्यासाठी मित्र  आवश्यक असतात. बालपणापासून आतापर्यंत तुमचा एकतरी खास मित्र झाला असेल अशा मित्राला आज शुभेच्छा देण्याचा दिवस आहे. त्याला सांगा की मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहे आणि तूच माझा बेस्ट फ्रेंड आहेस. त्यामुळे त्याला वरील संदेश पाठवायला विसरू नका. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी