Mathematics Day Speech in Marathi: दरवर्षी भारतामध्ये 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महान भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. 22 डिसेंबर 2012 रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी रामानुजन यांच्या वाढदिवसाच्या दिवसाला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी घोषणा याच दिवशी केली. श्रीनिवास रामानुजन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आज आपण राष्ट्रीय गणित दिवस 2022 भाषण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेत आहोत.
अधिक वाचा : पत्नी करत असेल हे काम तर समजून जा नाते तुटण्याच्या मार्गावर
आदरणीय
महोदय, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
आज आपण येथे ‘राष्ट्रीय गणित दिवस’ साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
गणिताशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आपल्या सभोवताची प्रत्येक गोष्ट गणित आहे. आपल्या सभोवताची प्रत्येक गोष्ट संख्या आहे. ही मानवी आत्म्याची सर्वात सुंदर आणि सर्वात शक्तिशाली निर्मिती आहे.
दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
महान गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये इरोड तामिळनाडू मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना गणितामध्ये आवड होती गणिताचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी गणित या विषयांमध्ये प्राविण्य मिळवले होते. त्यांनी संख्या सिद्धांत आणि अनंत मालिका यामध्ये मोठे योगदान दिले.
वयाच्या बाराव्या वर्षी ते वैदिक गणित आणि त्रिकोणमितीमध्ये तज्ञ झाले होते.
रामानुजन यांच्या संख्या सिद्धांताचा क्रिप्टोग्राफीमध्ये सर्वोत्तम उपयोग केला जातो. ते ट्रिनिटी कॉलेजचे पहिले भारतीय फेलो होते. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
माझे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 22 डिसेंबर २०१२ मध्ये त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला.
राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश गणिताविषयी जागरूकता निर्माण करणे आहे.
श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय गणित दिवस बद्दल भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो
जय हिंद जय भारत
अधिक वाचा : पोरांचं खोटं बोलणं कसं ओळखाल
राष्ट्रीय गणित दिवस 2022 भाषणाची सुरुवात कशी करावी?
आदरणीय महोदय प्राचार्य शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो या वाक्याने भाषणाची सुरुवात करावी.
राष्ट्रीय गणित दिवस कधी असतो?
22 डिसेंबर