National science day 2023 Funny Messages in Marathi : २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतातील महान भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक सर सी.व्ही. रमण यांनी प्रकाशाच्या विखुरण्यावर त्यांचा आधुनिक शोध जाहीर केला, ज्याला 'रामन इफेक्ट' म्हणून ओळखले जाते. सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या "रामन इफेक्ट" च्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. सी.वी. रमण यांना या अभूतपूर्व शोधासाठी 1930 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले आहे. (National science day 2023 Funny Messages marathi greetings to share via whatsapp status and facebook images with friends and family)
पण असे असले तरी बाबा बुवांच्या नादी लागून विज्ञान अमान्य करणारे, हातात काळे धागे बांधणारे असे अनेक लोक समाजात वावरत आहेत. त्यांना या विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेज तयार केले आहेत. ते तुमच्या मित्रांना पाठवा आणि मनमुराद आनंद घ्या.
हाता-पायात काळे धागे बांधणाऱ्याना विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुले होतात असा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांना पण आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. #राष्ट्रीय विज्ञान दिवस#
डावा हात खाजवत असल्यावर पैसे लवकरच मिळणार या आपेक्षेवर राहणाऱ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या वाट पाहून शुभेच्छा...
गुलाबी रंग येईपर्यंत टायट्रेशन करणाऱ्या सर्व सायन्स वाल्यांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा!
नागाच्या गळ्यात नागमणी शोधणाऱ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मित्राने घेतलं म्हणून सायन्स घेणाऱ्या बहाद्दरांना विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा! #NationalScienceDay2023 #राष्ट्रीय_विज्ञान_दिन
11 वी ला सायन्स आणि 12 वी ला आर्टस् घेणाऱ्यांना सुद्धा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्यांनी बळजबरी 11th ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला त्यांना सुद्धा राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा