National Science Day 2023: का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस; काय आहे यंदाची थीम

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Feb 27, 2023 | 22:22 IST

National Science Day 2023 history in Marathi :भारतात अनेक महान शास्त्रज्ञांनी जन्म घेतला. सर चंद्रशेखर व्यंकट रमन (Sir Chandrasekhar Venkata Raman) हे त्यांच्यापैकी एक आहेत. त्यांनी फिजिक्सच्या (physics) क्षेत्रात 28 फेब्रुवारी 1928 ला रमन प्रभाव चा शोध लावला आणि 1930 मध्ये त्यांच्या या शोधासाठी त्यांना नोबल पुरस्कार (Nobel Prize) मिळाला होता.

National Science Day 2023
National Science Day 2023: का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस; काय आहे यंदाची थीम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना विज्ञानाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आणि भारतातील महान वैज्ञानिकांचे स्मरण करणे हा आहे.
  • जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान आहे थीम
  • चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी फिजिक्सच्या क्षेत्रात 28 फेब्रुवारी 1928 ला रमन प्रभाव चा शोध लावला .

National Science Day 2023 history in Marathi : शास्त्रज्ञांच्या (scientists) बहुमुल्य योगदानामुळे भारत जलदगतीने विकास करणारा देश बनला आहे. मोठं-मोठे देश आज भारताकडील (India)तंत्रज्ञान खरेदी करण्यास आग्रही आहेत. भारतात अनेक महान शास्त्रज्ञांनी जन्म घेतला. सर चंद्रशेखर व्यंकट रमन (Sir Chandrasekhar Venkata Raman) हे त्यांच्यापैकी एक आहेत. त्यांनी फिजिक्सच्या (physics) क्षेत्रात 28 फेब्रुवारी 1928 ला रमन प्रभाव चा शोध लावला आणि 1930 मध्ये त्यांच्या या शोधासाठी त्यांना नोबल पुरस्कार (Nobel Prize) मिळाला होता. या शोधामुळे भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day) साजरा केला जातो.  

अधिक वाचा  : दादा! sorry म्हणजे सॉरी नव्हे; काही तरी वेगळचं आहे हे प्रकरण

काय आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 चे थीम 

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 चा थीम जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान याची घोषणा केली. या थीमचा अर्थ भारत 2023   मध्ये  प्रवेश करण्याबरोबर अनेक जागतिक समस्यांचा सामना करत आहे. फक्त भारतचं नव्हेतर इतर देश पण या जागतिक सामस्यांचा सामना करत आहेत. 
या समस्यांचा सामना करण्यासाठी जगाच्या कल्याणासाठी विज्ञानाचे महत्त्व पटवून द्यावे लागतील.  

अधिक वाचा  : तुमचा लूक सुंदर बनवणारे Latest Blouse Designs

जी20 च्या अध्यक्षतेसाठी प्रभावी थीम 

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी थीमचे उद्घाटन करताना म्हटलं की, राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान  थीम भारताच्या जी20 ची अध्यक्षतेसाठी अगदी योग्य आहे.  कारण भारत जागतिक दक्षिणचे अशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका महाद्वीपच्या विकासशील देशांचा सदस्य आहे. तसेच विकसनशील देशांचा आवाज बनू शकतो.  

अधिक वाचा  :  पोरांनो सांगा मुलींना काय बरं आवडत? नाही माहीत मग हे वाचा


विज्ञान दिवसाची सुरुवात कधीपासून झाली

1986 मध्ये नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन (National Council for Science and Technology) द्वारे भारत सरकारकडे विनंती करण्यात आली होती की, 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या रूपात साजरा करावा, तसेच सरकारने या निवेदनाचा स्विकार केला. हा दिवस सर सीव्ही रमण यांच्या 'रामन इफेक्ट' शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यासोबतच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना विज्ञानाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आणि भारतातील महान वैज्ञानिकांचे स्मरण करणे हा आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी