Rashtriya Yuva Divas bhashan, National Youth Day 2023 Speech in Marathi: भारतात दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस (Rashtriya Yuva Divas, National Youth Day) साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस होय. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना योग्य दिशा देतील यासाठीच त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशभरातील शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणअयात येतेात. या दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर भाषण, निबंध, व्याख्यान केले जाते. राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त भाषण कसे करावे? जाणून घ्या...
स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी या दिवशी... स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंद अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी आपल्या विचारांमुळे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. भारत तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील. यासाठी भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला.
हे पण वाचा : उत्साहाचा संचार करतील स्वामी विवेकानंदांचे विचार
1984 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1985 पासून देशभरात दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. नरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांच्याविषयी अभ्यास केला.
हे पण वाचा : तुमच्या राशीच्या व्यक्तीची बुद्धी किती तल्लख? वाचा
स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरू श्रीराम कृष्ण परमहंस यांच्याकडून अध्यात्मिक शिक्षण घेतले. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी हिंदुत्त्व आणि त्यांच्या गुरुंच्या विचारांचा जगभर प्रसार केला.
हे पण वाचा : काळ्या तांदळाचे उपाय करतील तुम्हाला मालामाल
स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन जगभरात ओळखली जाते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत. 1902 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे लहानसे भाषण शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा किंवा इतर कार्यक्रमात करु शकतात.