नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पाळायचे दहा नियम

नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्यांनी दहा नियमांचे काटेकोरपण पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करुन उपवास प्रामाणिकपणे करणाऱ्यांना व्रताचे फळ मिळते, असे म्हणतात. चला तर मग जाणून घेऊ नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पाळायचे दहा नियम....

navaratri vrat niyam in marathi
नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पाळायचे दहा नियम 
थोडं पण कामाचं
 • नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पाळायचे दहा नियम
 • दहा नियमांचे काटेकोरपण पालन करणे आवश्यक
 • नियमांचे पालन करुन उपवास प्रामाणिकपणे करणाऱ्यांना व्रताचे फळ मिळते, असे म्हणतात

नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्यांनी दहा नियमांचे काटेकोरपण पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करुन उपवास प्रामाणिकपणे करणाऱ्यांना व्रताचे फळ मिळते, असे म्हणतात. चला तर मग जाणून घेऊ नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पाळायचे दहा नियम....

 1. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात ब्रह्मचर्य पाळावे.
 2. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी खोटे बोलू नये. रागावणे, वाद घालणे टाळावे.
 3. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी लहान मुले-मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा आदर करावा. त्यांची काळजी घ्यावी.
 4. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी पान, तंबाखू, गुटखा, मावा, सिगरेट (धूम्रपान), विडी (धूम्रपान), दारू (मद्यपान), अंमली पदार्थ यांचे व्यसन करू नये. मांसाहार करू नये. मसालेदार पदार्थ खाऊ नये.
 5. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जाणीव ठेवून कोणत्या प्रकारचा उपवास करायचा याचा निर्णय घ्यावा आणि उपवासाच्या व्रताचे पालन प्रामाणिकपणे करावे. रसोपवार, फलोपवास, दुग्धोपवास, लघु उपवास, अधोपवास, पूर्णोपवास असे उपवासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या क्षमतेचा विचार करुन यापैकी योग्य त्या पर्यायाची निवड करावी.
 6. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे. नवरात्रोत्सवाच्या काळात सहल करणे, मौजमजा करणे टाळावे. व्रत प्रामाणिकपणे करावे.
 7. आजारी असल्यास उपवास करणे टाळावे. ज्या मुलीची अथवा महिलेची मासिक पाळी सुरू आहे तिने उपवास करणे टाळावे. गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा. युद्ध काळात उपवास टाळावा.
 8. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे. व्रत मध्येच तोडू नये. विशेष परिस्थितीमुळे व्रतभंग करणे आवश्यक असल्यास देवीची माफी मागून व्रतभंग करावा.
 9. अधोपवास म्हणजे एक वेळचे जेवून उपवास करणाऱ्यांनी नवमीच्या दिवशी दुधीचे कोणत्याही प्रकारे सेवन करू नये. प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे.
 10. सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन दिवशी उपवास करणाऱ्यांनी विधीवत व्रताची सांगता करावी. नऊ कुमारिकांना जेवण देऊन तसेच दक्षिण देऊन व्रत पूर्ण करावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी