Navratri 9 Colors: 'हे' आहेत नवरात्रीचे ९ रंग

navratri colours 2022 full schedule see what are the 9 colors of navratri : नवरात्रीला नऊ विविध रंगाचे कपडे परिधान केले जातात. पाहा यंदाचे नवरात्रीचे नऊ रंग.

navratri colours 2022 full schedule see what are the 9 colors of navratri
Navratri 9 Colors: 'हे' आहेत नवरात्रीचे ९ रंग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Navratri 9 Colors: 'हे' आहेत नवरात्रीचे ९ रंग
 • नऊ रंग ही नवरात्र उत्सव या सणाची मुख्य ओळख
 • नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ विशिष्ट रंगांचे कपडे परिधान करून सण साजरा करण्याची पद्धत

navratri colours 2022 full schedule see what are the 9 colors of navratri : कोरोना संकटामुळे सण साजरे करण्यावर निर्बंध आले होते. पण आता कोरोना नियंत्रणात असल्यामुळे निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करणे महाराष्ट्रात शक्य होणार आहे. दहीहंडी, गणेशोत्सव महाराष्ट्रात उत्साहात साजरे झाले. आता सोमवार 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्र (NAVRATRI OR NAVRATRI 2022) उत्सव साजरा होणार आहे. 

Shardiya Navratri 2022: शारदीय नवरात्रीत महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे पठण

नऊ रंग ही नवरात्र उत्सव या सणाची मुख्य ओळख आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ विशिष्ट रंगांचे कपडे परिधान करून सण साजरा करण्याची पद्धत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून ही पद्धत रूढ आहे. यंदा देखील नवरंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घ्या ९ दिवसाचे ९ रंग.

Navratri 2022: शारदीय नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'हे' काम, अवश्य पाळा नियम; नाहीतर नाराज दुर्गामाता

Navratri 2022: नवरात्रोत्सव का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

माळ वार आणि तारीख  रंग
पहिली माळ सोमवार 26 सप्टेंबर 2022 पांढरा
दुसरी माळ मंगळवार 27 सप्टेंबर 2022 लाल
तिसरी माळ बुधवार 28 सप्टेंबर 2022 नारंगी
चौथी माळ गुरुवार 29 सप्टेंबर 2022 पिवळा
पाचवी माळ शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 हिरवा
सहावी माळ शनिवार 1 ऑक्टोबर 2022 राखाडी
सातवी माळ रविवार 2 ऑक्टोबर 2022 निळा
आठवी माळ सोमवार 3 ऑक्टोबर 2022 जांभळा
नववी माळ मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 गुलाबी
 1. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची स्थापना केली जाते. यालाच घटस्थापना म्हणतात.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री अवताराची पुजा केली जाते.
 2. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रम्हचारिणी या रूपाची पुजा केली जाते.
 3. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा या देवीची पूजा केली जाते.
 4. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुशमंदा देवीच्या रूपाची पुजा केली जाते.
 5. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी भक्त स्कंदमाता या देवीच्या रूपाची पूजा केली.
 6. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पूजा केली जाते.
 7. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कलातरी देवीच्या रूपाची पूजा केली जाते.
 8. नवरात्रीच्या आठव्या दिवशी गौरी देवीची आराधना केली जाते.
 9. नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीधात्री देवीची पूजाअर्चा केली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी