Subhash Chandra Bose 2023 Jayanti Speech :
लिख रहा हूं मैं अजांम जिसका कल आगाज आएगा
मेरे लहू का हर एक कतरा इकंलाब लाएगा
मैं रहूं या न रहूं पर ये वादा है तुमसे मेरा कि
मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा
या शेरप्रमाणेच नेताजींच्या निधनानंतर देशभरात स्वातंत्र्याची लढाई तीव्र झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगात ऊर्जा संचारते देशाला अभिमान वाटेल अशी कृती करावी ही इच्छा मनात दाटून येते. धैर्य, साहस, दृढनिश्चय, संघर्ष, हे गुण आत्मसात करायचे असेल तर आपल्याला सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करत आहोत.
अधिक वाचा : सात तासाच्या बैठकीनंतर बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई
तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूँगा, हे वाक्य म्हटलं तर आपल्या समोर लष्कराच्या गणवेशात भाषण देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस उभे राहतात. त्याचबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो त्यांचा संघर्ष. बोस यांच्या या वाक्याने प्रेरित होऊन हजारो युवकांनी आपल्या हातातील नांगर खाली टाकत हातात रायफल घेतली. जुलमी ब्रिटीश राजवटीला देशातून हाकलून देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यात सामील झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या घोषणेच्या जोरावर आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.
अधिक वाचा : Chandrashekhar Bawankule यांचं पंकजा मुंडेंबाबत मोठ विधान
ओरिसा राज्यातील कटक येथे 23 जानेवारी 1897 रोजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी असे होते. सुभाषचंद्र बोस लहानपणापासून खूप हुशार आणि देशप्रेमी होते. नेताजींनी आपले प्रारंभिक शिक्षण कटक मधील रेवेनशा कॉलेजियेट स्कूलमधून पूर्ण केले. त्या नंतरचे त्यांचे शिक्षण कलकत्यातील के प्रेजिडेंसी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले.
नेताजींनी 15 वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंदांचे सर्व साहित्य वाचून टाकले. कॉलेज मधील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या आई वडिलांनी, इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या तयारीसाठी त्यांना इंग्लंडमधील केब्रिज विश्व विद्यालयात पाठून दिले. इंग्रज शासनाच्या काळात भारतीयांना सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाणे फार कठीण होते परंतु तरीही नेताजींनी सिव्हिल सर्व्हिस च्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली होती. परंतु त्यात त्यांचे मन रमले नाही.
अधिक वाचा : पीएम किसान योजनेतून आता ६ नाही तर ८ हजार मिळणार
सिव्हिल सर्व्हिस सोडल्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले. बंगालमधील प्रसिद्ध देशभक्त चित्तरंजन दास ह्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घ्यायला सुरूवात केली. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना महात्मा गांधी यांच्या अहिंसक विचार पडत नव्हते. एकीकडे महात्मा गांधी हे उदार दलाचे नेतृत्व करत होते तर दुसरीकडे सुभाष चंद्र बोस हे जहाल दलाचे नेते होते. असे असले तरी नेताजीं यांनीच गांधीजीना राष्ट्रपिता म्हणून नेताजींनी संबोधित केले होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींचे कार्य अनमोल आहे. देशाभिमानी आणि स्वाभिमानी नेताजींनी भारतीय स्वांतत्र्य लढ्यात उडी घेतल्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची चळवळ अधिकच आक्रमक झाली. सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा ब्रिटिशांविरुद्धात एल्गार उगारत लष्कराची उभारणी केली होती तेव्हा इंग्रजांना त्यांच्या नावाची धास्ती बसली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्या विरुद्ध उठाव होईल म्हणून इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना बंगालमधील अलिपूरच्या तुरुंगात डांबून ठेवले होते. त्यावेळी सुभाषबाबू यांनी अन्न त्याग केला. इंग्रज सरकार गडबडले व सुभाषबाबूंना मुक्त केले. पण पुन्हा त्यांना त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले. परंतु 1941 साली आपल्या ब्रिटीश पहारेक-याची नजर चुकवून त्यांनी घरातून पळ काढला. तिथून ते मौलवीचा वेष धारण करून अफगाणिस्तानात गेले आणि तिथून पुढे जर्मनीला गेले.