Vastu Shastra Tips: या ५ गोष्टी कधीच बेडजवळ ठेवू नका, आरोग्यावर होऊ शकतो घातक परिणाम 

लाइफफंडा
Updated Apr 05, 2022 | 14:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Shastra Tips । वास्तुशास्त्राचा अर्थ म्हणजे अर्थात 'वास्तुशास्त्राचे विज्ञान' असा होतो. हे पारंपारिक भारतीय प्रणालीवर आधारित ग्रंथ आहेत. घर बांधताना वास्तुशास्त्राचे पालन करणे, आरोग्य, संपत्ती आणि इतर अनेक घटकांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे दिसून येते. तसेच वास्तुशास्त्र हे घर बांधताना डिझाइन, लेआउट आणि मोजमाप, जमीन तयार करण्याच्या तत्त्वांचे पालन करण्यापुरते मर्यादित नाही तर ते जागेची व्यवस्था आणि स्थानिक भौगोलिक क्षेत्राचे वर्णन करते.

Vastu Shastra Tips For Bedroom
या ५ गोष्टी कधीच बेडजवळ ठेवू नका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्राचा अर्थ म्हणजे अर्थात 'वास्तुशास्त्राचे विज्ञान' असा होतो.
  • वास्तुशास्त्र हे एक खरं तर शास्त्र आहे, त्यामुळे याच्या यादीत टेक्नॉलॉजी आहे.
  • वास्तु आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेते.

Vastu Shastra Tips । मुंबई : वास्तुशास्त्राचा अर्थ म्हणजे अर्थात 'वास्तुशास्त्राचे विज्ञान' असा होतो. हे पारंपारिक भारतीय प्रणालीवर आधारित ग्रंथ आहेत. घर बांधताना वास्तुशास्त्राचे पालन करणे, आरोग्य, संपत्ती आणि इतर अनेक घटकांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे दिसून येते. तसेच वास्तुशास्त्र हे घर बांधताना डिझाइन, लेआउट आणि मोजमाप, जमीन तयार करण्याच्या तत्त्वांचे पालन करण्यापुरते मर्यादित नाही तर ते जागेची व्यवस्था आणि स्थानिक भौगोलिक क्षेत्राचे वर्णन करते. कोणत्या खोलीत आणि कोणत्या दिशेला काय ठेवावे हे जाणून घेतल्याने आरोग्यामध्ये आश्चर्यकारकपणे सुधारणा होऊ शकते. (Never keep these 5 things near the bed, it can have harmful effects on health). 

वास्तु आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेते. खासकरून जेव्हा आपण झोपतो, ज्यामुळे आपला स्वभाव, विचार करण्याची पद्धत, मन:स्थिती आणि शरीराच्या अवयांवरही परिणाम होऊ शकतो. चला तर म जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार आपल्या खोलीतील कोणत्या ५ गोष्टी बदलल्या पाहिजेत. 

अधिक वाचा : काश्मिरी पंडितांवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला

मोबाईल फोन

वास्तुशास्त्र हे एक खरं तर शास्त्र आहे, त्यामुळे याच्या यादीत टेक्नॉलॉजी आहे. कारण आजच्या धावपळीच्या जीवनात फोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लक्षणीय बाब म्हणजे आपण झोपेत असताना देखील त्याला आपल्यापासून दूर ठेवणे कठीण आहे. मात्र किमान झोपताना फोन उशीखाली ठेवू नका. मोबाईल फोन सतत मोबाईल टॉवरच्या संपर्कात असतात, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तयार करते.

तुमचा फोन चार्ज होत असताना किंवा नेटवर्क खराब असताना परिस्थिती आणखी वाईट होते. आपल्या फोनच्या सभोवतालचे रेडिएशन आपल्या मेंदूला हानी पोहचवू शकते आणि आपली वाढ मंद करू शकते. मोबाईल फोन किंवा टॅब पासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी झोपताना फोन बंद करून ठेवा अथवा फ्लाइट मोडवर ठेवा. मात्र जर स्विच ऑफ करणे शक्य नसेल तर आपल्या पासून दूर ठेवा. 

अधिक वाचा : या तारखांना जन्मलेले लोक जिद्दी आणि कष्टाळू असतात

WiFi राउटर 

आताच्या कालावधीत तंत्रज्ञानाचा एक भाग असलेला वायफाय राउटर मोबाईल फोनपेक्षा अधिक सुरक्षित नाहीत. खरं तर ते फोनपेक्षा जास्त रेडिएशन निर्माण करतात. त्यामुळे बेडरूममध्ये वायफाय राउटर बसवणे टाळा. मात्र कोणताही दुसरा पर्याय नसेल तर तो रात्रीच्या वेळी बंद ठेवा. 

मऊ खेळणी

मऊ खेळण्यांनी तुमची खोली सजवणे ही ऐकायला आणि प्रत्यक्षात अनुभवायला चांगली कल्पना वाटू शकते. परंतु वास्तुशास्त्रानुसार ती चांगली योजना नाही. तुमची खेळणी कितीही मऊ किंवा गोंडस असली तरी त्यामध्ये तुमचा आत्मविश्वास करण्याची खूप क्षमता असते. मऊ खेळणी केवळ वातावरणातील ओलावा, घाण आणि धूळ शोषत नाहीत तर ते सर्व नकारात्मक भावना आणि वाईट हेतू यांना देखील आकर्षित करतात. हे तुमच्या बेडरूममध्ये ठेवल्याने तुमच्या झोपेवर त्याचा घातक परिणाम होऊ शकतो. तसेच तुम्हाला भीतीदायक स्वप्ने आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. 

अधिक वाचा : रणबीर - आलिया 17 एप्रिलला अडकणार लग्नाच्या बेडीत

बॉक्स असलेला बेड 

बॉक्स बेड हा एक आधुनिक शोध आहे. जो आजच्या पिढीची जागा व्यापण्याची समस्या सोडवतो. जे लोक अपार्टमेंटमध्ये राहतात त्यांच्याकडे योग्य जागेचा स्पेस नसतो. म्हणून ती लोक त्यांचे बॉक्स बेड सामग्रीने भरतात. त्यामुळे बेडखाली हवा मोकळ्यापणाने फिरू शकत नाही अशा बेडवर झोपणे टाळावे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा या जड आणि गोंधळलेल्या जागेमुळे तुम्हाला नेहमी सुस्ती वाटते. 

निगेटिव्ह किंवा डार्क रंगाची पेंटिंग

बहुतांश लोक आपल्या बेडच्या मागील भिंतीवर किंवा बेडरूममध्ये कुठेही डार्क कलर लावतात. जर पेंटिंगचे रंग चमकदार असतील किंवा ते आनंद दर्शवित असतील तर ते तुम्हाला शांत झोपायला नक्कीच मदत करेल. पण जर पेंटिंग डार्क किंवा निगेटिव्ह भावना दर्शवत असेल तर त्याचा तुमच्या मूडवर परिणाम होईल. तुमच्या खोलीत कोणत्याही प्रकारचे पेंटिंग न लावणे चांगले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी