Astrology Tips : अनेक वेळा स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना घाईघाईत हातातून तेल पडते. ज्योतिषशास्त्रानुसार, तेल पडणे हे घरामध्ये संकट येण्याचे संकेत देते. इतकंच नाही तर ज्योतिषशास्त्रात तेल पडणे हे व्यक्तीवरील कर्ज वाढण्याशीही जोडलेले आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात, माणूस घाईघाईने काम करतो घाईघाईत एखादी गोष्ट करायला गेलात की हमखास काहीतरी चुकीचं घडते. घाईघाईत काम करताना काही वेळा हातातून वस्तूही पडतात.अशा स्थितीत लोक ते उचलून पुन्हा योग्य ठिकाणी ठेवतात, पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी अशा असतात, ज्यांचे पडणे, सांडणे अत्यंत अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार त्या वस्तू पडू नयेत. अधूनमधून पडल्या तर काही हरकत नाही, मात्र असे वारंवार घडत असेल तर सावधान राहण्याची गरज आहे.
अधिक वाचा : गरमीमध्ये अशा प्रकारे सहज कमी करा वजन, फॉलो करा या टिप्स
मीठ हा दैनंदिन जीवनात वापरला जाणारा अन्नपदार्थ आहे. हे दररोज अन्नात वापरले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मीठाचा संबंध शुक्र आणि चंद्राशी आहे. जर त्या दिवशी तुमच्या हातातून मीठ पडले तर ते पत्रिकेत चंद्र आणि शुक्राची कमजोर स्थिती दर्शवते. शुक्र ग्रहाच्या कमकुवत स्थितीमुळे विवाहित लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होतात. दुसरीकडे, जेव्हा चंद्र कमजोर असतो तेव्हा व्यक्तीला श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असते
अधिक वाचा : मुंबईला नाही पाण्याची चिंता, शिल्लक आहे ५५ दिवसांचा पाणीसाठा
अनेक वेळा स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना घाईघाईने हातातून तेल पडते. ज्योतिषशास्त्रानुसार, तेल पडणे हे घरामध्ये संकट येण्याचे संकेत देते. इतकंच नाही तर ज्योतिषशास्त्रात तेल कमी होण्याचा संबंध व्यक्तीवरील कर्ज वाढण्याशीही जोडला जातो.
गॅसवर दूध तापवायला ठेवलंय हे बऱ्याचदा विसरायला होतं, किंवा घाईघाईत दुधाचं पातेलं हातातून निसटते. हे ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानले जाते.असे म्हटले जाते की दुधाचा संबंध चंद्र ग्रहाशी आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या हातातून दूध एकसारखे सांडत असेल तर घरात पैशाची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत, व्यक्तीने नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे.
( डिस्क्लेमर : वर दिलेली सर्व माहिती गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)