लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय? तर जरूर वाचा हे...

लाइफफंडा
Updated Feb 10, 2021 | 19:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

लॅपटॉपच्या अधिक वापराने तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जास्त वेळ मांडीवर ठेवून काम केल्यास इन्फर्टिलिटीची समस्या उद्भवू शकते. 

laptop
लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताय...तर जरूर वाचा हे... 

थोडं पण कामाचं

  • लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्यास पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या उद्भवू शकते
  • लॅपटॉपमधून निघणारी उष्णता स्कीन आणि टिश्यूचा हानी पोहोचवतात. 
  • लॅपटॉपचा वापर करताना वायफाय कनेक्शनवर लक्ष द्या

मुंबई: कोरोना(cororna) महामारीमुळे मुलांपासून ते कर्मचारी घरातूनच काम करत आहे. वर्क फ्रॉम होमचे(work from home) प्रमाण वाढले आहे. लोक तासनतास लॅपटॉप(laptop) समोर बसलेले असतात. अनेकदा लॅपटॉप मांडीवर ठेवून अनेक तास काम केले जातेय मात्र तुम्हाला हे माहीत आहे की मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नव्हे. लॅपटॉपच्या अधिक वापराने तुमच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तसेच बराच वेळ मांडीवर ठेवून काम केल्यास पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या सतावू शकते. 

लॅपटॉपला जोडलेले वायफाय कनेक्शन तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. अनेक गंभीर आजारांना तुम्ही या निमित्ताने आमंत्रण देता. अशातच लॅपटॉपवर काम करताना काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. 

पुरुषांसाठी ठरू शकते घातक

एका रिपोर्टनुसार लॅपटॉपमधून बाहेर पडणारी उष्णता महिलांच्या तुलनेत पुरुषांसाठी अधिक घातक आहे. शरीराची रचना त्यामागचे कारण आहे. गर्भाशय हे महिलांच्या शरीरात असते तर पुरुषांमध्ये अंडकोष हे शरीराच्या बाहेरील भागात असतो. लॅपटॉप मांडीवर घेतल्याने त्यातून निघणारे हिट रेडिएशन हे पुरुषांमधील स्पर्म (शुक्राणू) कमी करु शकतात. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. यामुळेच पुरुषांनी आपल्या मांडीवर लॅपटॉप ठेवू नये.

इतर आरोग्यासंबंधित समस्या

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम केल्यास शरीरावर त्वचेसंबंधित त्रास होऊ शकतात. यामुळे शरीराच्या मणक्याचा आकार देखील बदलतो. सर्व्हायकलची समस्याही होण्याची शक्यता असते. दरम्यान, लॅपटॉपवरील वायफाय कनेक्शन हे अधिक घातक असते. त्यामुळे काम झाल्यावर लगेचच वायफाय बंद करा. तसेच नेटवर काम असेल तरच वायफाय ऑन करा. 

लॅपटॉपचा वापर करताना शील्डचा वापर जरूर करा. यामुळे लॅपटॉपमधून निघणारे हानिकारक उष्णता आणि रेडिएशनमुळे तुमचा बचाव होऊ शकतो. शील्ड नसल्यास लॅपटॉप कव्हर अथवा इतर गोष्टींचा वापर करू शकता. लॅपटॉपचा वापर करता तो एखाद्या लाकडाच्या टेबलावर अथवा स्टूलवर ठेवा. यामुळे त्यातून निघणारी उष्णता आणि रेडिएशनपासून बचाव होऊ शकतो. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी