Husband wife relationship: पत्नीला अजिबात आवडत नाहीत पतीच्या ‘या’ सवयी, आजपासूनच करा बंद

कुणीही प्रत्येक कामात परफेक्ट असू शकत नाही, हे प्रत्येकालाच माहित असतं. तुमच्या पत्नीला एखादी गोष्ट नीट करता येेत नसेल, तर ते सांगण्याच्या योग्य पद्धतीचा तुम्ही विचार करायला हवा.

Husband wife relationship
पत्नीला अजिबात आवडत नाहीत पतीच्या ‘या’ सवयी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पत्नीशी संवाद साधताना काही गोष्टी आणतात अडथळे
  • पत्नीला माहेरच्या मंडळींवरून टोमणे मारण्याची सवय ठरते घातक
  • इतर महिलांसोबत केलेली तुलना येऊ शकते अंगाशी

Husband wife relationship: तुमच्या जोडीदारासोबत (Partner) तुमची सतत भांडणं (Fights) होत राहतात का? तुम्हाला छोट्यामोठ्या कारणावरून तुमची पत्नी उगाचच त्रास देते आणि भावनिक होते, असं वाटतं का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील, तर ही बाब गांभिर्यानं घेण्याची गरज आहे. पती-पत्नीमध्ये (Husband and wife) अधूनमधून मतभेद किंवा भांडणं होणं ही सामान्य बाब आहे. मात्र सातत्याने संवादापेक्षा जास्त भांडणंच होत असतील, तर मात्र तुमच्या नात्याला तुम्ही अधिक वेळ देण्याची गरज आहे. कारण वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. अनेकदा तर मजेमजेत बोललेल्या काही गोष्टीदेखील इतक्या मनावर घेतल्या जातात, की त्यातून गैरसमजच वाढीस लागण्याची शक्यता असते. साधारण मनुष्यस्वभावानुसार कुठल्याही पत्नीला पतीच्या कुठल्या बाबी आवडत नाहीत, हे जाणून घेणं आवश्यक आहे. या गोष्टी मजेतही कधी न करण्याचा सल्ला दिला जातो. 

तुला काहीच येत नाही!

कुणीही प्रत्येक कामात परफेक्ट असू शकत नाही, हे प्रत्येकालाच माहित असतं. तुमच्या पत्नीला एखादी गोष्ट नीट करता येेत नसेल, तर ते सांगण्याच्या योग्य पद्धतीचा तुम्ही विचार करायला हवा. जर तुम्ही एखादी गोष्ट तुला बिलकूल येत नाही, असं वारंवार म्हणत राहिला, तर पत्नीला वाईट वाटेलच, शिवाय तिचा वारंवार मूडऑफही होत राहिल आणि तुमच्यावरील प्रेम संपत राहिल. त्यामुळे बोलताना शब्द आणि वाक्यरचना यांचा विचार करा. 

अधिक वाचा - Tips for staying in hotel: हॉटेलमध्ये एकटं राहायची वाटते भिती? महिलांच्या सुरक्षेसाठी सोप्या टिप्स

इतर महिलांची स्तुती

प्रत्येकात काही ना काही चांगुलपणा असतो. मात्र त्यामुळे तुम्ही प्रत्येक बाबतीत तुमच्या पत्नीची तुलना इतरांशी करणं योग्य नाही. असं केल्यामुळे पत्नीला दुःख होतं आणि त्याचं भांडणात रुपांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पत्नीसमोर शक्यतो इतर महिलांचं कौतुक करणं टाळण्याचा सल्ला अनेकजण देतात. 

सासरच्या मंडळींची निंदा

पत्नीच्या माहेरच्या मंडळींवर टीका करणे, त्यांना सतत टोमणे मारणे या प्रकारामुळे तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. प्रत्येक छोट्यामोठ्या कारणांवरून पत्नीच्या घरच्यांचा उद्धार करणे आणि त्यांना सतत टोमणे मारत राहणे, योग्य नाही. त्यामुळे तुमचे नातेसंबंध खराब होतात आणि घरातील ताणतणाव सातत्याने वाढत राहतात. आपले घर सोडून आलेल्या पत्नीचे आपल्या माहेरासोबत भावनिक बंध असतात. ते दुखावले जाणं, हे कुठल्याही महिलेला आवडत नाही. त्यामुळे याबाबत बोलतााना शब्द जपून वापरा. 

अधिक वाचा - Hidden Camera in oyo : ओयो रूम किंवा लॉजच्या रूममध्ये कॅमेरा लपवून तर नाही ना ठेवला? अशा प्रकारे घ्या शोध

एकत्र घालवा वेळ

कुठल्याही नात्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असतं. कामाच्या घाईगडबडीत हा वेळ देता येत नाही. त्यामुळे नात्यात निर्माण झालेला दुरावा संपायला संधीच मिळत नाही. आठवड्यातून किमान एक पूर्ण दिवस कुटुंबासाठी रिकामा ठेवणे आणि पत्नीसोबत अधिकाधिक वेळ घालवणे आवश्यक आहे. 

डिस्क्लेमर - नातेसंबंधांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न वा समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी