Husband wife secret: आपल्या पत्नीला कधीच सांगू नका 'या' ३ गोष्टी, अन्यथा...

Chanakya niti: चाणक्य नीतीमध्ये मैत्री, करिअर, वैवाहिक आयुष्य, पैसा याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Chanakya Niti in Marathi: हिंदू धर्मात लग्न समारंभाला खूप महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की, त्याहूनही महत्त्वाचं आहे ते म्हणजे योग्य जीवनसाथी मिळणे. आपल्या आयुष्यात जो कुणी येईल त्याने मनापासून आपल्यावर प्रेम करावे आणि सुखाने संसार करावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पती आणि पत्नीच्या नात्याचा पाया हा सत्यावर अवलंबून असतो. पती आणि पत्नीचे नाते तेव्हाच घट्ट होते जेव्हा ते एकमेकांपासून काहीही लपवत नाहीत. मात्र, आचार्य चाणक्य यांनी एक वेगळेच काही सांगितले आहे. (never share these things with wife chanakya niti read in marathi)

आचार्य चाणक्यांच्या धोरणांमध्ये सर्व प्रकारच्या नातेसंबंधांचा उल्लेख आहे. यामध्ये आयुष्याच्या संबंधित अनेक धोरणे आहेत. मात्र, त्याच दरम्यान पती आणि पत्नीच्या नात्या संदर्भात त्यांनी जे म्हटले आहे तसे वागल्यास वैवाहिक आयुष्य आणखी आनंदात जाऊ शकते. 

चाणक्य नीतीमध्ये मैत्र, करिअर, वैवाहिक आयुष्य, पैसा याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपली काळजी घेणारा पती किंवा पत्नी मिळाली तर त्यांचा जोडीदार हा नेहमीच खूश राहतो. इतकेच नाही तर पत्नीने आपली काळजी घेतली तर पती आपल्या आयुष्यातील सर्व गुपित देखील तिच्यासमोर सांगतो. मात्र, आचार्य चाणक्यांनी अशा पुरुषांबाबत काही वेगळे म्हटले आहे. 

अधिक वाचा : Shravan 2022: ग्रहांचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात मोरपंख ठरेल फायद्याचे, करा 'हे' उपाय होईल सकारात्मक लाभ

अशा काही गोष्टी आहेत ज्या पतीने आपल्या पत्नीसोबत कधीच शेअर करु नयेत. कारण या गोष्टी पत्नीसोबत शेअर केल्यास त्याचा फटका पतीला बसून आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.

कधीही सांगू नका आपला वीक पॉईंट

असे म्हटले जाते की, पुरुषाने कोणत्याही स्त्रीला विशेषत: आपल्या पत्नीला त्याच्या वीक पॉईंट्सबद्दल सांगू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की, जर पत्नीला आपल्या पतीच्या कमकुवतपणाची जाणीव झाली तर ती त्याचा फायदा घ्यायला सुरू करते. इतकेच नाही तर काही वेळा पत्नी त्याचा वापर एक शस्त्र म्हणून देखील करते.

अधिक वाचा : Vastu Tips: घराच्या ' या' दिशेला अन्नपूर्णेचा फोटो लावल्यास धन आणि अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही

जुन्या अपमानाचा उल्लेख 

कधी कधी पुरुषांच्या आयुष्यात अशी काही घटना घडते ज्यावेळी चूक नसतानाही त्याला अपमान सहन करावा लागतो. अशावेळी जर एखाद्या पुरुषासोबत हे खरोखर घडले असेल तर त्याने आपल्या पत्नीसमोर कधीही त्या अपमानाचा उल्लेख करू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की, त्यावेळी पत्नी तुमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करेल पण नंतर काही कारणांमुळे त्याच  घटनेची आठवन ती तुम्हाला वारंवार करुन देईल.

तुमची कमाई किती

स्त्री ही घरातील लक्ष्मी असते असं म्हणतात. मात्र, काही स्त्रिया या खूपच खर्च करत असतात. अशा परिस्थितीमध्ये पतीने आपल्या पत्नीसोबत त्याच्या उत्पन्नाबाबतची माहिती थेट सांगू नये. कारण, असे केल्यास पैसे गुंतवणूक किंवा सेव्हिंग करण्याऐवजी ती महिला खर्च अधिक करु शकते. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही).

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी