मुंबई: जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की घरात कोणत्या गोष्टी कोणत्या ठिकाणी ठेवल्या पाहिजे तर तुमचे उत्तर काय असेल? कदाचित तुम्ही याचे उत्तर अगदी सहजतेने द्याल. मात्र जर तुम्हाला असा प्रश्न केला की किचनमध्ये(kitchen) कोणत्या गोष्टी (store) स्टोर करू नयेत तर तुमचे उत्तर काय असेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर कदाचित तुमच्याकडे नसेल. अनेकजण काहीही सामान किचनमध्ये स्टोर करतात मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या किचनमध्ये स्टोर केल्याने अनावश्यक नुकसानही पोहोचते. या लेखात आम्ही तुम्हाला हेच सांगत आहेत की कोणत्या गोष्टी किचनमध्ये स्टोर करू नयेत. घ्या जाणून..never store this thing in kitchen.
गॅस सिलेंडर
अनेकांच्या घरातील किचनमधील एखाद्या कोपऱ्यात अथवा अन्य ठिकाणी अतिरिक्त गॅस सिलेंडर स्टोर केलेला असतो. जर सुरक्षेच्या नजरेतून पाहिले तर कधीही कुकिंग सिलेंडरशिवाय इतर सिलेंडर किचनमध्ये स्टोर करू नयेत. जर एखाद्या कारणामुळे किचनमध्ये आग लागत असेल तर नुकसान एका पटीने नव्हे तर दहा पटीने वाढते. अशातच छोटा असा मोठा कोणत्याही प्रकारचा सिलेंडर स्टोर करू नये. खासकरून गॅस सिलेंडर भरलेला असेल तर तो कधीही किचनमध्ये स्टोर करू नये.
केमिकल प्रॉडक्टसचा अर्थ साफ-सफाईमध्ये वापरले जाणारे प्रॉडक्ट्स. अनेकांना सवय असते की या साफ सफाईच्या गोष्टी किचनमध्ये ठेवण्याची. कदाचित तुम्हाला माहीत असेल वा नसेल काही केमिकल प्रॉडक्ट्स आपोआप गरमी तसेच धुरामळे रिअॅक्ट होऊ लागतात. ज्यामुळे जेवणासह तुम्हालाही नुकसान पोहोचते. अशातच कोणत्याही केमिकल प्रॉडक्टला किचनमध्ये स्टोर करू नये.
अनेकजण असे असतात की जे कांदे आणि बटाटेत एकत्र मिक्स करून किचनमध्ये स्टोर करतात.. मात्र या गोष्टी किचनमध्ये ठेवू नयेत. कारण किचनमध्ये पुरेशी हवा खेळत नसल्याने दोन्ही गोष्टी लवकर खराब होतात. याशिवाय कांदा आणि बटाटा मिक्स करू नये. कारण हे दोन्ही लवकर अंकुरित होऊ लागतात. अशातच तुम्ही या दोन्ही गोष्टी किचनमध्ये न ठेवता दुसऱ्या जागी ठेवाव्यात.
अनेकदा किचनमध्ये इतकी जागा असते की न वापरल्या जाणाऱ्या वस्तूही सोप्या पद्धतीने स्टोर केल्या जातात. जसे पेट्स फूड्स, ऑईली रॅग्स अथवा फर्निचर पॉलिश पेंट या गोष्टी स्टोर करू नयेत. याशिवाय कोणत्याही प्रकारचे औषध किचनमध्ये स्टोर करू नयेत. तसेच लिक्विड औषध किचनमध्ये स्टोर करू नये.