Shower during Thunderstorm : वीज कडाडताना अंघोळ करू नका, वाचा वैज्ञानिक कारण

घराबाहेर असताना अचानक वीजा चमकू लागल्या तर काय करायचं, हे अनेकांना माहित असतं. मात्र घरी असताना काय काळजी घ्यावी, हे ठाऊक नसतं.

Shower during Thunderstorm
वीज कडाडताना अंघोळ करू नका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वीज कडाकड असताना अंघोळ करणे टाळा
  • वीजवाहक गोष्टींपासून राहा लांब
  • भांडी धुणे, कपडे धुणेही टाळा

Shower during Thunderstorm : उन्हाळ्याच्या (Summer) शेवटी आणि पावसाळ्यात (Monsoon) अनेकदा विजांचा कडकडाट (Thunderstorm) ऐकू येतो. ढग गडगडू लागणे आणि विजा चमकू लागणं हे अनेकदा धोक्याचं लक्षण (Dangerous) असतं. अशा परिस्थितीत वीज कोसळण्याची शक्यता असते. जगभरात दरवर्षी वीज कोसळून सुमारे 24 हजार लोकांचा मृत्यू होतो. वीजेपासून वाचण्यासाठी काय करावं, याचे अनेक उपाय आपल्याला माहित असतात. मात्र हे सगळे उपाय घरातून बाहेर असताना करावयाचे असतात. ज्याप्रमाणे झाडाखाली उभे राहू नये, वीजेच्या खांबाखाली उभं राहू नये, वीजा कडाडत असताना वायर असणारा फोन वापरू नये (मोबाईल सुरक्षित असतो) वगैरे अनेक उपाय आपण ऐकलेले असतात. मात्र घरात असतानादेखील वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याच्या आणि काही वेळा मृत्यू घडल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे केवळ घराबाहेर असतानाच नव्हे, तर घरात असतानादेखील काळजी घेण्याची गरज असते. 

वीज शोधते मार्ग

जेव्हा वीज कोसळते, तेव्हा ती जमिनीत जाण्यासाठी अधिकाधिक सोयीचा मार्ग निवडत असते. वीजेसाठी पाणी किंवा कुठलाही धातू हा अधिक सोयीचा मार्ग असतो. त्यामुळे ज्या गोष्टीतून वीजेचा प्रवाह वाहू शकत नाही, अशा गोष्टी या काळात सुरक्षित मानल्या जातात. घरात असणारं पाणी, लोखंड, सळ्या किंवा इतर धातू ज्या ठिकाणी असतील, त्यांच्याकडे वीज आकृष्ट होते. त्यामुळे या कालावधीत अशा गोष्टींपासून शक्य तितक्या दूर राहण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो. 

शॉवर असतो धोकादायक

वीजा कडाडत असताना जर तुम्ही शॉवरने अंघोळ करत असतात, तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. कारण पाणी आणि धातू हे दोन्ही विजेचे वाहक असतात. शॉवरमध्ये तर यो दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे जमिनीकडे वाहून नेण्यासाठी अधिकाधिक सोप्या आणि जलद मार्गाचा नैसर्गिकरित्या वीजेकडून वापर केला जातो. त्यात हा मार्ग वीजेसाठी सोयीचा असल्यामुळे अंघोळ करताना जोरदार वीजेचा झटका बसण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Escalators: शूज स्वच्छ करण्यासाठी नाही तर, 'या'साठी असतात एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश; जाणून घ्या त्यामागचं कारण

काँक्रिटची भिंतही ठरते धोकादायक

कॉँक्रिट हे काही वीजेचं वाहक नाही. मात्र तरीही काँक्रिटच्या भिंतींपासून दूर बसावं, असं वीजा कडाडत असताना सांगितलं जातं. काँक्रिट स्वतः वीजवाहक नसलं तरी काँक्रिटच्या भिंतींमध्ये मोठ्या प्रमाणात सळया वापऱण्यात आलेल्या असतात. या सळ्या धातूच्या असतात ज्या वीजेचा आकर्षित करून घेतात. त्यामुळे या भिंतीला टेकून बसलेल्यांचा वीजेचा धक्का बसण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Friendship Test : तुमची दोस्ती किती खोल आहे? हे 7 निकषच देतील उत्तर

या गोष्टी टाळा

पाऊस सुरू असताना भांडी धुणे, कपडे धुणे यासारख्या पाण्याशी संबंधित गोष्टी टाळल्या पाहिजेत. घरात सर्वात मोठा पाण्याचा साठा जिथे असेल तिथून काही अंतरावर आपण बसलं पाहिजे. त्याचप्रमाणे वीजेची उपकरणं बंद करून ठेवली पाहिजेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी