Rakshabandhan 2020: रक्षाबंधनासाठी सोप्या आणि मस्त मेहंदी डिझाईन

लाइफफंडा
Updated Aug 03, 2020 | 09:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rakshabandhan 2020: महिला नटण्या मुरडण्यासाठी सणाची वाट बघत असतात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे मेहंदी. जर तुम्हालाही हातावर मेहंदी काढायची असेल तर खाली आम्ही तुमच्यासाठी सोप्या आणि मस्त डिझाईन्स देत आहोत. 

rakshabandhan
रक्षाबंधनासाठी सोप्या आणि मस्त मेहंदी डिझाईन  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • कोरोनाचा प्रसार होत असल्या कारणाने अनेक मार्केट बंद आहेत
  • तुम्हालाही हातावर मेहंदी काढायची असेल तर खाली आम्ही तुमच्यासाठी सोप्या आणि मस्त डिझाईन्स देत आहोत. 
  • कोरोनाच्या संक्रमणामुळे बाहेरून मेहंदी काढणेही थोडेसे धोकादायक आहे.

मुंबई: रक्षाबंधनाचा सण(rakshabandhan festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा ३ ऑगस्टला हा सण साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचा हा सण केवळ भावा-बहिणींचाच नाही तर बहिणींसाठी नटण्या-मुरडण्याचा सण आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी नटून थटून आपल्या भावाला राखी बांधतात. या साजृशृंगाराचा मुख्य भाग म्हणजे मेहंदी. मुलींना मेहंदी(mehndi) काढायला आवडतेच. रक्षाबंधनाच्या दिवशी, महिला, मुली आपल्या हातावर मेहंदी काढतात. दरम्यान, यंदा कोरोनामुळे लोक आपल्या घरातच आहेत.कोरोनाचा प्रसार होत असल्या कारणाने अनेक मार्केट बंद आहेत. जर तुम्हालाही हातावर मेहंदी काढायची असेल तर खाली आम्ही तुमच्यासाठी सोप्या आणि मस्त डिझाईन्स देत आहोत. 

यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे दरवर्षीप्रमाणे यंदा राखीची धूम कमी आहे. बाजारात नेहमीप्रमाणे राख्या सजलेल्या नाहीत. तसेच कोरोनामुळे बाजारात गर्दीही नाही. यावर्षी घरात सुरक्षितपणे राखीचा सण साजरा केला जाईल. कोरोनाच्या संक्रमणामुळे बाहेरून मेहंदी काढणेही थोडेसे धोकादायक आहे. जर तुम्ही बाहेर मेहंदी काढत असाल तर ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन तुम्ही मेहंदी काढणयासाठी बाहेर जा. 

हे आहेत मेहंदीचे डिझाईन्स

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी