कोविड-19 नंतर किचनला नवे रूप देण्याचे ट्रेंड

किचन हे कोणत्याही घराचे हृदय असते आणि लॉकडाउन सुरू झाल्यापासून किचनमधील गजबज आणखी वाढली आहे. कोविड-19 नंतरच्या कालावधीमध्ये किचनचे डिझाइन बदलण्यावर आता लोकांनी भर दिला आहे. 

new modulor kitchen  after covid-19 pandemic
कोविड-19 नंतर किचनला नवे रूप देण्याचे ट्रेंड 

थोडं पण कामाचं

  • कोविड-१९ ने जगात थैमान घालण्यापूर्वी जग काही निराळे होते.
  • महामारीमुळे लोकांच्या वागण्या-बोलण्यामध्ये नवे बदल झाले आहेत.  
  • कोविड-19 नंतरच्या कालावधीमध्ये किचनचे डिझाइन बदलण्यावर आता लोकांनी भर दिला आहे. 

मुंबई : कोविड-१९ ने जगात थैमान घालण्यापूर्वी जग काही निराळे होते. सकाळची कॉफी करणे असो किंवा ऑनलाइन खरेदी करणे असो किंवा कुटुंब आणि जीवन यासाठी खास जागा सजवणे असो, महामारीमुळे लोकांच्या वागण्या-बोलण्यामध्ये नवे बदल झाले आहेत.  

किचन हे कोणत्याही घराचे हृदय असते आणि लॉकडाउन सुरू झाल्यापासून किचनमधील गजबज आणखी वाढली आहे. कोविड-19 नंतरच्या कालावधीमध्ये किचनचे डिझाइन बदलण्यावर आता लोकांनी भर दिला आहे. 

कोविड-19 नंतरच्या कालावधीतील किचनचे डिझाइन अधिक मोकळे असेल, मोड्युलर किचन डिझाइन असेल, तसेच अन्न शिजवणे व साठवणूक यासाठी अनुकूल सोयी असतील, असे दिसून येते. आपले किचन भविष्यातील या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत का, याचबरोबर महारीनंतरच्या काळामध्ये किचनच्या बाबतीत कोणते नवे ट्रेंड दिसत आहेत, हे जाणून घेऊया. 

1.    मोकळे व मोड्युलर किचन 
करोनाव्हायरस महामारीमुळे लोकांना घरी राहणे भाग पडले आहे. यामुळे किचनमधला वावर आणि किचनचा वापर वाढला आहे. शहरांमध्ये जागेची चणचण असल्याने मोकळे व मोड्युलर किचन लोकप्रिय होणार आहे. मोड्युलर किचनची निवड करणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांच्या पसंतीनुसार डिझाइन निवडण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांना अनेक डिझाइन व रंग यातून आवडते डिझाइन व रंग निवडता येऊ शकतो.  

मोड्युलर किचन हे प्रत्येक घरासाठी विशेष व वेगळे असू शकते. आधीच तयार केलेले कॅबिनेटचे भाग वापरून तयार केलेले मोड्युलर किचन साधे, पण ऐटदार दिसते. त्यामध्ये अत्यंत आकर्षक स्टायलिंग व डिझाइनिंग वापरले जाते. 

मोड्युलर किचन मोकळे व सुटे करता येऊ शकते आणि गरज असेल तेव्हा सहजपणे पुन्हा जोडता येऊ शकते. त्यांच्या अॅक्सेसरीज व फिटिंग विविध प्रकारच्या डिझाइनमध्ये उपलब्ध होतात. भारतात एल (L) आणि यू (U) हे किचन डिझाइनचे आकार सर्रास वापरले जातात. दीर्घ कालावधीमध्ये, विविध अॅक्सेसरीज वापरून किचन तयार करण्याची लवचिकता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. जागेची बचत करण्याचे, जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे, कॉर्नरचा व किचनमधील कमी वापर होणाऱ्या भागांचा वापर करण्याचे नावीन्य लक्ष वेधून घेणार आहे. 

मोड्युलर किचनमध्ये आकर्षक रंगांची दारे, स्टेनलेस स्टील डोअरनॉब अशा ऐटदार हार्डवेअरचा समावेश असते. हे सर्व सहजपणे निर्जंतुक करता येऊ शकते. सध्या, मोड्युलर किचनमध्ये कमालीचा बदल होत आहे. ओपन-शेल्व्हिंग पर्याय आणि जगभर प्रभावी ठरलेली उपकरणे यांच्यामध्ये होत असलेल्या वाढीमुळे किचनची उपयुक्तता व वापर अनेक पैलूंनी वाढत आहे. सोशलायइज होण्यासाठी किचन हा मुख्य घटक बनतो आहे. योग्य अंतर राखण्यासाठी आयलंड काउंटर किंवा काउंटर हाइट टेबल हा चांगला पर्याय ठरतो आहे. 

2.    साठवणुकीची अधिक क्षमता 
चांगले रूप आणि उपयुक्तता यांची सांगड घालणाऱ्या आधुनिक डिझाइनना गृहिणींची पसंती वाढते आहे. गेल्या तिमाहीत किराणा मालाच्या खरेदीच्या बाबतीतील विचार बारकाईने पाहिला तर, बास्केटचा व पिशव्यांचा सरासरी आकार नक्की वाढला आहे. 

याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे विविध राज्यांमध्ये प्रवासावर व लॉकडाउनबाबत घालण्यात आलेले निर्बंध, तसेच पुरवठा कमी होईल, या भीतीने भरपूर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा वाढत असलेला कल. परिणामी, या अतिरिक्त खरेदीसाठी साठवणुकीची जास्तीत जास्त जागा निर्माण करण्याचा विचार किचनच्या डिझाइनमध्ये दिसून येऊ लागला आहे. 

बरण्या व कोरड्या वस्तू ठेवण्याठी अनेक कप्पे असतील असे सहजपणे उघडता येतील असे पुल-आउट किंवा स्लायडर असणाऱ्या लार्डर किंवा पँट्री युनिटना गृहिणी प्राधान्य देऊ लागल्या आहेत. प्रत्यक्ष उपयोगाच्या अनुषंगाने ग्राहक या उपयाचा विचार करू लागले आहेत.  

3.    अँटि-बॅक्टेरिअल लॅमिनेट व सहज स्वच्छ करण्यासारखे पृष्ठभाग
देखभाल करावी लागणार नाही, असे पृष्ठभाग प्रामुख्याने स्टोन, ग्लास व लॅमिनेट यापासून बनवले जातात. कारण ते स्वच्छ करण्यास सोपे असतात. आपल्या घरातल्या किचन काउंटरपार्ट, किचन कॅबिनेट, हँडल्स व नॉब अशा काही ठिकाणी आपला वारंवार स्पर्श केला जातो. 

वारंवार स्वच्छ करणे गरजेचे असलेली ही ठिकाणेही अँटि-बॅक्टेरिअल स्वरूपाची असणे आवश्यक आहे. अँटि-बॅक्टेरिअल, अँटि-फंगल असणारे व सहजपणे सॅनिटाइज करता येऊ शकतात अशी नवी लॅमिनेट उपलब्ध आहेत. 

4.    फळे व भाज्यांसाठी खेळता वारा 
बटाटे, कांदे व अन्य भाज्या ठेवण्यासाठी लाकडी बकेट हा उत्तम पर्याय आहे. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसलेल्या कांदा व बटाटे अशा भाज्यांसाठी विकर बास्केट वापरणे योग्य ठरते. बाजारातून आणलेल्या भाज्या धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी स्वतंत्र जागा निर्माण करावी, अशी सूचना गृहिणी डिझाइनरना करत आहेत.

5.    कनेक्टेड किचन
विषाणूचे संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक लोकांनी घरकामासाठी मदत घेण्याचा विचार बाजूला ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे, डिशवॉशरसारख्या श्रेणींना गेल्या वर्षी अंदाजे 250 टक्के वाढ साध्य करण्यासाठी मदत झाली आहे, असे या उद्योगातील सूत्रांकडून समजते. याचप्रमाणे, यूही-सी यावर आधारित सॅनिटायझेशन वापरण्याची गरज अनेक पटींनी वाढली आहे. विश्वासार्ह ब्रँडची असणारी आणि प्रभावीपणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अशा सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित असणारी अशी उपकरणे आणि आरोग्यासाठी सुरक्षित गॅजेट यांचा वापर करणारी स्मार्ट किचन आणि एकात्मिकरण यांना ग्राहक प्राधान्य देऊ लागले आहेत.

तसेच, बाहेरच्या कोणाची तरी मदत घेण्यावरील अवलंबित्व कमी होत असल्याने, गृहिणी आता अशा प्रकारचे पर्याय पाहत आहेत जे अत्यंत सोयीस्कर असतील, तसेच घरातल्या कामांचा व्यापही कमी होईल. किचनच्या डिझाइनमध्ये डिशवॉशर समाविष्ट करण्याची पद्धत निश्चितच वाढत जाणार आहे, असे दिसते. ही पद्धत वापरल्याने घरकामासाठी कोणाची तरी मदत घेण्यावरील अवलंबित्व नक्की कमी होईल, तसेच वेळेच्या बाबतीतही हे सोयीस्कर ठरेल. तसेच, स्वयंपाक करणाऱ्या बाईवर अवलंबून राहण्याऐवजी किचनमध्ये ब्लेंडर्स व चॉपर्स वापरणे हे अविभाज्य ठरू लागणार आहे. 

6.    जागेचा योग्य व जास्तीत जास्त वापर 
अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे, महामारीच्या दरम्यान एकाच वेळी भरपूर किराणा सामान घेऊन ठेवण्यात आल्याने कॅबिनेट व डॉवर किराणा सामाने भरून गेले होते. इंटर्नल फिटिंगमुळे ही समस्या सोडवता येऊ शकते. योग्य प्रकारच्या अॅक्सेसरीज वापरल्या तर कॅबिनेट स्टोअरेज अधिक उत्तम व व्यवस्थित करता येऊ शकते. किचन कॉर्नर युनिट अनेकदा दुर्लक्षित असतात, असे पाहणीतून दिसून येते. साठवणुकीसाठी अत्यंत सोयीस्कर असणारे मॅजिक कॉर्नर व मूव्हिंग कॉर्नर हार्डवेअर यांचा वापर केल्यास जागेचा योग्य वापर करता येऊ शकतो. 

7.    तज्ज्ञांच्या मदतीने डिझाइनची निर्मिती 
सध्याच्या गृहिणींना जागतिक स्तरावर सुरू असलेल्या नव्या व विविध ट्रेंडची अधिक माहिती असते. इंटरनेट व सोशल मीडिया यामुळे गृहिणी आता पूर्वीच्या तुलनेत अधिक कालावधी व प्रयत्न डिझाइनची चर्चा करण्यामध्ये घालवत असतात. तसेच, डिझाइनरचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याचे महत्त्वही त्यांना आता लक्षात येऊ लागले आहे. हा एकत्रितपणे जागेचे डिझाइन आखण्याचा ट्रेंड भविष्यातही कायम राहील व वाढत जाईल, असे वाटते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी