New Year Celebration Places : मुंबई : दोन दिवसात नवीन वर्षाला (New Year) सुरुवात होणार आहे, हे या नववर्षाचे जोरदारपणे स्वागत करण्यासाठी अनेकांनी आपले प्लान तयार केली आहेत. तुम्हीही कुठे बाहेर जाणून येणाऱ्या वर्षाचे स्वागत करणार असाल तर आजचं प्लान करा. नाहीतर ऐनवेळी तिकीट मिळणार नाही आणि तुमचा सर्व प्लान रद्द करावे लागेल. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कुठे जावे हे कळत नसेल तर आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांची माहिती देत आहोत, जेथे जाऊन तुम्ही नववर्षाची पार्टी करू शकतात. (New Year Celebration Places in Pune, Lonavala, Mumbai,know the prices)
ख्रिसमस पार्टी संपल्यानंतर पार्टी करणं बंद झाले असेल असं वाटत असेल तर थांबा पार्टी आयोजन करण्याचा सर्वात मोठा इव्हेंट अजून बाकी आहे. हा इव्हेंट म्हणजे 31 डिसेंबर. अलीकडे 31 डिसेंबरला पार्टी आयोजित करणं वाढलं आहे. या दिनानिमित्त मित्र-मैत्रिणींची भेट होत असते. जर पार्टीचे ठिकाण तुमचं निश्चित झालं नसेल तर हा लेख वाचा आणि आपल्या पार्टीचे ठिकाण ठरवा. आज आपण पुणे, लोणावळा, मुंबईमधील पार्टी ठिकाणं जाणून घेणार आहोत. ख्रिसमस असो किंवा नववर्ष साजरा करणं असो, पुणे, लोणावळा , मुंबईमध्ये मोठी गर्दी होत असते.
नव्या वर्षाचे स्वागत नाचून साजरे करायचे असेल तर पुण्यातील या ठिकाणी जा. उठून तुमचे पाय दुखत नाहीत तोपर्यंत नाचत राहा. कारण पुण्याची सर्वात मोठी बॉलीवूड NYE पार्टी आहे. या कार्यक्रमाला लाइव्ह गायकांसह देशातील काही प्रसिद्ध डीजे आणि जादूचा कार्यक्रम असणार आहे. हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांसह नवीन वर्षाचे दमदार स्वागत करू शकतात.
कुठे: मेफिल्ड इस्टेट, मिओ पॅलाजिओ सोसायटी (Mio Pallazio Society) जवळ, तुळाजा भवानी नगर, खराडी, पुणे.
केव्हा: 31 डिसेंबर 2022.
किंमत: रु. 999 नंतर
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्हाला चांगल्या चवीच्या जेवणासह उत्तम संगीत आणि दारूचे सेवन करायचे असेल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे. कारण आम्ही ज्या पार्टी ठिकाणाची माहिती देत आहोत, तेथे दारू आणि उत्तम चवीचे जेवण देखील मिळते. हे ठिकाण आहे, द फिएस्टा. हा कार्यक्रम पुणे 14 आणि झेटा हयात रिजन्सी हॉटेलद्वारे आयोजित केला गेला आहे.
वर्षातील शेवटाचा दिवस हा मोकळ्या आकाशाखाली घालवयचा असेल तर पवना डॅमवरील कॅम्पिंगला जा. गुलाबी थंडीत शेकोटी भोवती डान्स करण्याचा अनुभव तुम्हाला येथे मिळेल. तुम्ही या ठिकाणी तुमचे मित्र आणि कुटुंबासोबत जावू शकतात.
कुठे: पवना तलाव कॅम्पिंग पवना तलाव, लोणावळा, पुणे
केव्हा: 31 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023.
किंमत: रु. 1099 नंतर
उत्तम संगीत, भोजन, मद्य, सेवन करायचे असेल तसेच. धमाकेदार डीजेच्या आवाजात डान्स करायचा असेल तर पुण्यातील नवीन वर्षाचा कार्निव्हल चुकवू नका.
कुठे: रॉयल पाम्स, 84/36, एन मेन रोड, कोरेगाव पार्क अॅनेक्सी, मुंढवा, पुणे.
केव्हा: 31 डिसेंबर 2022.
किंमत: रु. 399 नंतर
काहीतरी नवीन, काहीतरी आकर्षक अशा ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करायचे असेल तर पुण्यातील हेव्हन्स गेट 2023 या कार्यक्रमात जा. कारण हा कार्यक्रम बाकीच्या कार्यक्रमांपेक्षा वेगळा आहे कारण त्यात लेझर शो आणि लाइव्ह ढोल आहे.
कुठे- धर्म 9, युनिट नंबर 10, द मिल्स, स्टेशन रोड,
शेरेटन ग्रँड हॉटेलच्या मागे, संगमवाडी, पुणे
केव्हा: 31 डिसेंबर 2022.
किंमत: रु. 2000 नंतर
फक्त 200 रुपयात जंगी पार्टी करायची असेल तर पुण्यातील Hello 2023, New Year Eve येथे जा. हा कार्यक्रम अंब्रेला इव्हेंट्सद्वारे आयोजित केला जातो आणि नृत्य आणि भोजनासोबत अनेक मजेदार गोष्टी येथे केल्या जातात.
कुठे: कोद्रे फार्म हॉल आणि लॉन्स, सिंहगड रोड, राजयोग सोसायटीच्या मागे, लोकमत कार्यालयाजवळ, वडगाव खुर्द, नांदेड फाटा, पांडुरंग औद्योगिक क्षेत्र, पुणे
केव्हा: 31 डिसेंबर 2022.
किंमत: रु. 199 पासून पुढे .
नववर्षाचे स्वागतासाठी तुम्हाला अमर्याद आनंद लुटायचा असेल तर दर आयरिश हाऊसमध्ये पार्टी करा. अमर्यादित दारू, अमर्यादित खाद्यपदार्थ, संगीताचा अनुभव घ्यायचा असेल तर येथे या.
ठिकाण: 207, विमान नगर रोड, क्लोव्हर पार्क, विमान नगर, पुणे.
नवीन वर्षाच्या संध्याकाळच्या पार्ट्यांचे आकर्षक आयोजन येथे होत असते. हे हॉटेल एक शांत ठिकाण आहे. लोणावळ्यातील या हॉटेलमध्ये आकर्षक पार्ट्याचे आयोजन केले जाते.
किंमत: INR 2900 : INR 3800
स्थान:. क्रमांक : 163, प्रभाग बी, जुनी मुंबई : पुणे महामार्ग, मुलाकत हॉटेलसमोर, खंडाळा, लोणावळा, महाराष्ट्र