New Year Shayari to share your Friends, Family and Love One's, Happy New Year 2023, Marathi shayari: नव्या वर्षाची सुरुवात रविवार 1 जानेवारी 2022 रोजी होत आहे. नव्या वर्षाचे स्वागत भारतासह जगभर उत्साहाने केले जाते. सरत्या वर्षासोबत दुःख आणि अडचणी मागे पडलील. नवे वर्ष स्वतःसोबत आनंद आणि सुख घेऊन येईल या विश्वासातून प्रत्येकजण ओळखीतल्यांना उत्साहाने नववर्षाच्या शुभेच्छा देत उगवत्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करतो. हीच परंपरा लक्षात घेऊन टाइम्स नाऊ मराठी खास मराठी वाचकांसाठी घेऊन येत मराठमोळे नववर्षाच्या शुभेच्छा देणारे शायरी रुपातले संदेश, हे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. आपणही आपल्या ओळखीतल्यांना फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मराठमोळे नववर्षाच्या शुभेच्छा देणारे शायरी रुपातले संदेश शेअर करू शकता.
2023ची सोनेरी पहाट
मनोमनी आशेचे ढग दाट
अंगावर चैतन्याची लाट
चाला आयुष्याची सुंदर वाट
नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....!
नव्या वर्षात पाऊलं पडे
वाजती सनई चौघडे
सरले गत वर्ष जरी रडे
या वर्षाला नमन माझे
उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन् सोनेरी स्वप्नांची झळाळी
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ
नव्या स्वप्नांचा प्रारंभ
प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखं
नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!