Daily Exercise Benefits: तंदुरुस्त राहण्यासाठी जरूरी नाही रोज व्यायाम करणे, जाणून घ्या काय सांगतो हा अहवाल

लाइफफंडा
Updated Sep 12, 2020 | 14:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

No need to exercise daily: कोरोनाच्या काळात खाण्यापिण्यासोबतच दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, पण एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की रोज व्यायाम करण्याची आवश्यकता नसते.

Daily exercise
Daily Exercise Benefits: तंदुरुस्त राहण्यासाठी जरूरी नाही रोज व्यायाम करणे, जाणून घ्या काय सांगतो हा अहवाल  |  फोटो सौजन्य: Shutterstock

थोडं पण कामाचं

  • आठवड्यात एकदाच केलेला व्यायामही असतो आरोग्यदायक
  • WHO अनुसार १८-६४ वर्षांच्या वयातील लोकांनी करावेत आठवड्यात १५० मिनिटांच्या मध्यम तीव्रतेचे एरोबिक व्यायाम
  • कमी व्यायाम केल्यानेही अकाली मृत्यूपासून बचाव करता येऊ शकतो

नवी दिल्ली: स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी (Better health) आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी (protection from deceases) प्रत्येकजण व्यायाम करतो (everyone exercises) किंवा करू इच्छितो (or wishes to exercise). काही लोक तर वर्कआऊट करण्यासाठी खासगी प्रशिक्षकही (some people hire personal trainer for workout) नेमतात. पण एका संशोधनातून असे दिसून आले आहे की तासंतास जिममध्ये घाम गाळण्याची गरज (a research has shown that there is no need to sweat in gym everyday for hours) नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (World Health Organization) १८-६४ वर्षांच्या वयातील (people of the age 18 to 64) लोकांनी आठवड्यात १५० मिनिटांच्या मध्यम तीव्रतेचे एरोबिक व्यायाम (150 minutes of aerobic exercise of medium pace) किंवा दर आठवड्याला ७५ मिनिटे अधिक तीव्रतेचे एरोबिक व्यायाम करण्याचे (75 minutes of aerobic exercise at faster pace) लक्ष्य ठेवावे.

आठवड्यात एकदाच व्यायाम करणारे अधिक तंदुरुस्त

‘जेएएमए आंतरिक चिकित्सा’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार एखादी व्यक्ती किती जास्त किंवा कमी व्यायाम करते यावर त्याचे कमी किंवा दीर्घ आयुष्य अवलंबून नसते. ६३,००० लोकांसह एक सर्वेक्षण करण्यात आले ज्यांनी सांगितले की, ते आठवड्यात फक्त एकदा किंवा दोनदाच व्यायाम करतात. यात असे आढळून आले की या लोकांची मृत्युची जोखीम ३०-३४ टक्क्यांनी कमी झाली होती.

असे होते संशोधनाचे निष्कर्ष

या संशोधनातून सिद्ध झाले आहे की, निर्देशांपेक्षा कमी व्यायाम केल्यानेही अकाली मृत्यूची जोखीम कमी केली जाऊ शकते. जे लोक दररोज व्यायाम करतात आणि जे लोक फक्त एकदोन दिवसच व्यायाम करतात या दोघांमध्येही हृदयरोगाचा धोका ४०% कमी होतो.

अधिक तंदुरुस्तीसाठी करतात अधिक व्यायाम

संशोधनातून समोर आले आहे की, दररोज जिममध्ये तासंतास घाम गाळल्यानेच आपण सर्व आजारांपासून दूर राहाल असे नसते. तंदुरुस्त राहण्यासाठी निर्देशांनुसारही आपण कमी व्यायाम किंवा आठवड्यात एक किंवा दोनवेळा जरी चांगल्या पद्धतीने व्यायाम केलात तरी आपल्याला फायदा होतो. आता प्रश्न असा आहे की लोक जिममध्ये तासंतास घाम का गाळतात? याचे उत्तर असे आहे की, लोकांचे आरोग्याविषयीचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. आपल्या आवश्यकतेनुसार लोक व्यायाम करतात. दररोज व्यायाम केल्याने काहीही नुकसान होत नाही. जर आपल्याला वेळ असेल आणि आपली इच्छा असेल तर आपण दररोजही व्यायाम करू शकता.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी