फक्त तीन आठवड्यात कमी होईल लठ्ठपणा, '२१ डे वॉक प्रोग्राम फॉर वेट लॉस' आहे गरजेचं

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 14, 2021 | 09:19 IST

लठ्ठपणामुळे आजारपण येत असते. यामुळे वजन वाढलं तर अनेकजण चिंतेत असतात. कारण लठ्ठपणामुळे फक्त आजारपण येत नाही तर शरीराचा आकार पण बदलत असतो.

Obesity will be reduced in just three weeks
फक्त तीन आठवड्यात कमी होईल लठ्ठपणा   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • लठ्ठपणा तीन आठवड्यात दिवसात होईल कमी
  • अंमल करा २१ डे वॉक प्रोग्राम फॉर वेट
  • वजन कमी करण्यासाठी चालणं आवश्यक

नवी दिल्ली : लठ्ठपणा(Obesity)मुळे आजारपण येत असते. यामुळे वजन(weight) वाढलं तर अनेकजण चिंतेत असतात. कारण लठ्ठपणामुळे फक्त आजारपण येत नाही तर शरीराचा आकार पण बदलत असतो. जर तुमचं वय कमी असेल तर वजन कमी करण्यास सोपं जातं कारण कमी वय असलेल्या व्यक्तीचा मेटाबॉलिज्म चांगला असतो. पण जर तुमचं वय अधिक असलं तर वजन कमी करण्यास तुम्हाला खूप अडचणी येत असतात. दरम्यान एक शोधात असे म्हटलं आहे की, वय जरी जास्त असले तरी वजन कमी करणं सोपं आहे, पण त्यासाठी तुम्हाला २१ दिवसांचा वॉक प्रोग्रामचा(21 Day Walk Program) अंमल करावा लागेल. 

काय आहे २१ डे वॉक प्रोग्राम फॉर वेट लॉस (21 Day Walk Program)

नावावरुन आपल्याला आयडिया आली असेल की, हे वजन कमी करण्यासाठी एक प्रोग्राम आहे.  नागरिकांना २१ दिवसांसाठी चालण्याचा आणि पळण्याचा योजना आखावी लागते. यात कार्डियो वॉक, जॉगिंग आणि पळण्याचा समावेश आहे. तीन आठवड्यात नागरीक हळू - हळू आपली पळण्याची क्षमता वाढवत असतात. 

अहो दादा! कार्डिओ वॉक काय असतं? 

कार्डिओ वॉक मध्ये अधिक गतीने चालावे लागते. आपल्या हाताला छातीच्या समोर ठेवावे लागतात. चालताना हातांना मागे-पुढे करावे लागते. एका कार्डिओ वॉकसाठी सरासरी वेग हा ३ ते ४.५ मैल प्रतितास असावा लागतो. तर जॉगिंग एक आरामदायक पळणं असतं यात व्यक्ती ४ ते ६ मैल प्रति तास गतीने पळावे लागते. यापेक्षा अधिक गती घेतल्यास त्याला रनिंग म्हटलं जातं.

पहिला आठवडा 

पहिल्या आठवड्यात १/ मैल पायी चालावे आणि आर्धा रस्ता जॉगिंग करावी. दुसऱ्या दिवशीही याच पद्धतीने आपला प्लान आखावा. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी दोन मैल चालावे. यात १/ मैल कार्डिओ वॉक आणि ३/ जॉगिग करावे. पाचव्या दिवशी आराम करावा. सहाव्या दिवशी पहिल्या दिवसासारखं १२ मिनिटे चालावे. तर सातव्या दिवशी १/ मैल वॉक, १/ मैल जाॉगिग, नंतर १/ मैल वॉक आणि शेवटी १/ मैल रनिंग करावी. याला पंधरा मिनिटे परत करावे.

दुसरा आठवडा 

पंधरा मिनिटे आधी ३/ मैल चालावे, १/ कॉर्डिओ वॉक, १/ मैल, नंतर १/ मैल वॉक करावे. नव्या दिवशी ३/ मैल जॉगिंग, नंतर १/ मैल कार्डिओ वॉक आणि अर्धा मैल जॉगिंग करावे. याला १२ मिनिटे परत परत करावे. दहाव्या दिवशी आराम करावा आणि ११ व्या दिवशी दोन मैल चालावे यात ३/ मैल जॉगिंग करावी आणि १/ मैल कार्डिओ वॉक करावे. १२ व्या दिवशी ३/ मैल जॉगिंग, १/ मैल वॉक, १/ मैल रनिंग, करावी, १/ मैल कार्डिओ वॉक करा. यात १८ मिनीटे परत परत करावे. तेराव्या दिवशी १ मैल जॉगिंग, १/ मैल कार्डिओ वॉक, १/ मैल पळावे आणि परत चालावे. पुढील दिवशीही १५ मिनिटांपर्यंत १ मैल जॉगिंग आणि १/ मैल कार्डिओ वॉक करावं.

तिसरा आठवडा 

१५ व्या दिवशी आराम करावा. १६ व्या दिवशी ३/ मैल जॉगिग करावी, १/ वॉक करावे, म्हणजेच एकूण ३ मैल चालावे. १७ व्या दिवशी १ मैल जॉगिंग करावी. १/ मैल वॉक, आर्धा मैल पळावे नंतर १/ मैल वॉक करावे, हे २० मिनिटापर्यंत करावं. १८ व्या दिवशी २० मिनिटांपर्यंत १ मैल जॉग आणि १/ मैल वॉक करावे. १९ व्या दिवशी अर्धा मैल पळावे. नंतर चालावे. पंधरा मिनिटे याला परत परत करत राहवे. २० व्या दिवशी आराम करावा आणि २१ व्या दिवशी अर्धा मैल पळावे आणि १/ कार्डिओ वॉक २० मिनिटे करावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी