Honeymoon Destianation : भारतातील 6 ऑफबीट हनीमून ट्रॅव्हल डेस्टीनेशन, सौंदर्य पाहून भारावून जाल

लाइफफंडा
Updated Nov 12, 2022 | 18:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Honeymoon Destianation : भारतातील सर्वात सुंदर ऑफबीट हनीमून डेस्टीनेशची (Honeymoon Destianation) ही लिस्ट आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, आणि शांततेत वेळ घालवण्यासाठी, हनीमून कपलसाठी ही योग्य डेस्टीनेशन आहेत.

offbeat honeymoon travel destinations in India for couples
हनीमूनसाठी 'या' डेस्टीनेशनचा नक्की विचार करा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतातील 6 ऑफबीट हनीमून डेस्टीनेशन
  • हनीमून कपल्ससाठी 'या' डेस्टीनेशनचा उत्तम पर्याय
  • रोमॅण्टिक, निसर्गाच्या सान्निध्यात घालवा असा वेळ

Honeymoon Destianation : भारतातील सर्वात सुंदर ऑफबीट हनीमून डेस्टीनेशची (Honeymoon Destianation) ही लिस्ट आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, आणि शांततेत वेळ घालवण्यासाठी, हनीमून कपलसाठी ही योग्य डेस्टीनेशन आहेत. 

नवविवाहित कपल्स हनिमूनची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, भारतातीतल हनिमूनची ठिकाणं खूप गजबजलेली आहेत. त्यामुळे भारतातील सुंदर आणि ऑफबीट हनीमून डेस्टीनेशनची यादी आम्ही केलेली आहे. ही ठिकाणं हनीमूनला जाणाऱ्या कपल्ससाठी खास आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात आणि शांततेत इथे क्वालिटी टाइम स्पेंड करता येतो. 

कूर्ग, भारतातील हे सुंदर ठिकाण हनीमूनसाठी खूप चांगला पर्याय आहे. ज्याला "भारताचे स्कॉटलंड" म्हणून संबोधले जाते. हे छोटेसे  शहर तलाव, कॉफीचे मळे, धबधबे, नयनरम्य टेकड्या आणि दऱ्या आणि मंदिरे यांसह नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे.


पॉंडिचेरी हेसुद्धा हनिमूनसाठी देखील एक चांगले ठिकाण आहे, त्याला "द लिटल पॅरिस" देखील म्हटले जाते. वृक्षाच्छादित मार्गांचे चित्तथरारक सौंदर्य, शांत समुद्र असा अशी एक रोमॅण्टिक जागा आहे. 

हे हिमालयातील आणखी एक स्वप्नवत शहर आहे जे तुम्हाला बजेटमध्ये आंतरराष्ट्रीय सहलीची अनुभूती देईल. हिरवीगार देवदार झाडे, नद्या, बर्फाच्छादित पर्वत, वसाहती इमारती आणि ताज्या हवेने परिपूर्ण असेल.


पुरी हे फक्त एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे असा तुमचा विश्वास असेल, तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. पुरी हे निर्मळ समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आहे, ज्यामुळे ते समुद्रकिनारी हनिमूनसाठी एक आदर्श ठिकाण आहे. 


मुन्नार हे रोमँटिक हनीमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, हिरव्यागार दऱ्या आणि सुंदर वाहणारे बॅकवॉटर. त्यामुळे मुन्नार हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. 

हिमाचल प्रदेशातील सुंदर मैदानी प्रदेशात वसलेले डलहौसी हे एक गजबजलेले शहर आहे . ऑफ-सीझनमध्ये याला पर्यटक कमी भेट देतात, त्यामुळे याचाही तुम्ही विचार करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी