Old Accessories: जुन्या ऍक्सेसरीज नवीन पद्धतीने कर कॅरी, तुम्ही दिसाल खूपच आकर्षक

Old Accessories:महिलांसाठी उत्तम आणि स्टायलिश पोशाख घालणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तुम्ही तुमच्या ऍक्सेसरीजवरही लक्ष देणं महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या जुन्या ऍक्सेसरीजला नव्या स्टाईलने कॅरी करून तुमचा लुक खास बनवू शकता.

Carry old accessories in a new way, you will look very attractive
जुना ब्राण्ड... नवा लूक... नवी झळाळी...   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नव्या ढंगात.... नव्या रंगात... जुन ते सोनं...
  • अशा कॅरी करा जुन्या अँक्सेसरीज
  • जुन्या अँक्सेसरीजना नवा लूक...

Old Accessories: नवी दिल्ली:  महिलांसाठी उत्तम आणि स्टायलिश पोशाख घालणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तुम्ही तुमच्या ऍक्सेसरीजवरही (Accessories) लक्ष देणं महत्त्वाचे आहे. संपूर्ण लुकसाठी आकर्षक ऍक्सेसरीज बाळगणे आवश्यक आहे. कदाचित यामुळेच महिलांच्या कपड्यांप्रमाणेच ऍक्सेसरीज वॉर्डरोबमध्येही विविध प्रकारच्या दागिन्यांचा संग्रह असतो. मात्र, काही काळानंतर महिलांना त्याच प्रकारच्या ऍक्सेसरीज वापरण्याचा कंटाळा येतो. इतकंच नाही तर कधी-कधी तुमची ऍक्सेसरीज इतकी जुनी होतात की तुम्हाला ती घालायची इच्छाही होत नाही.पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच त्या जुन्या ऍक्सेसरीज (Old Accessories) फेकून द्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या जुन्या ऍक्सेसरीजला नव्या स्टाईलने कॅरी करून तुमचा लुक खास बनवू शकता. (Carry old accessories in a new way, you will look very attractive)

आर्म कफ म्हणून नेकलेस वापरा


आपल्या सर्वांच्या ऍक्सेसरी वॉर्डरोबमध्ये चंकी नेकपीस असतात. पण प्रत्येक वेळी ते नेक एरियावरच नेले पाहिजे असे नाही. जर तुम्ही एथनिक वेअरमध्ये ऍक्सेसरीजद्वारे फ्यूजन लूक तयार करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा बोहेमियन लूक तयार करू इच्छित असाल. तर तुम्ही नेकलेस चंकी ब्रेसलेट किंवा आर्म-कफ म्हणून घालू शकता. फक्त आपल्या हाताभोवती एक चंकी हार गुंडाळा. अशा प्रकारे नेकपीस एक उत्तम आर्म-कफमध्ये बदलेल आणि तुम्हाला वेगळा लुक मिळेल.


एक पेंडेंट बनवा


आपल्या सर्वांच्या ऍक्सेसरीज वॉर्डरोबमध्ये पेंडेंट्स असतातच. साधारणपणे, पेंडेंट डेली वेअरपासून पार्टीपर्यंत, भारतीय पोशाखांपासून ते वेस्टर्न वेअरवर कॅरी केले जाऊ शकतात. पण आता जर तुम्हाला लटकन एथनिक वेअरसोबत अशा प्रकारे पेअर करायचे असेल की स्टेटमेंट लूक तयार होईल, 
तर तुम्ही लटकन मांगटीका म्हणून घालू शकता. या साध्या स्टाईल हॅकसह तुम्ही भारतीय पोशाखांमध्ये तुमचा लूक रॉक करू शकता.


अँकलेटला हेडचेन बनवा


बोहो फॅशन ट्रेंड कधीही आऊट ऑफ स्टाईल नसतात. हॉलिडे लूकमध्ये तुम्हाला नवीन स्टाईल ट्राय करायची असेल, तर तुम्ही बोहो स्टाइल कॅरी करू शकता. मात्र, हा लूक कसा रॉक करायचा याचा विचार करत असाल तर ते खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त तुमच्या ऍक्सेसरीजकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. तुमच्या वॉर्डरोबमधून जुनी अँकलेट काढा आणि हेड चेनप्रमाणे स्टाईल करा. मॅक्सी स्कर्ट ते जॅकेटवर तुम्ही सहजपणे स्टाइल करू शकता.


हँडबॅगसोबत नेकपीस कॅरी करा


ऍक्सेसरीज म्हणजे केवळ तुम्ही तुमच्या शरीरावर जे दागिने वापरता तेवढंच नव्हे. तर, तुमच्या हँडबॅगपासून ते घड्याळ इत्यादीचाही ऍक्सेसरीजमध्ये समावेश होतो, ज्याचा तुमच्या लूकवर परिणाम होतो. डिझायनर हँडबॅगची किंमत हजारो-लाखोंमध्ये असल्याने सर्वसामान्य महिलांना ती खरेदी करणे शक्य होत नाही. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमची साधी हँडबॅगसुद्धा डिझायनर बनवू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या बॅगवर एक सॉलिड रंगाचा क्लच किंवा नेकपीस पिन अप करायचा आहे. हे इतके सोपे आणि उत्कृष्ट हॅक आहे की ते त्वरित आपल्या साध्या बॅगला अतिशय आकर्षक स्वरूप देईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी