Chanakya Niti: फक्त अशा लोकांनाच समाजात उच्च स्थान मिळते; हात लावताच मातीचेही होतं सोनं

लाइफफंडा
Updated May 09, 2022 | 13:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chanakya Niti In Marathi | आचार्य चाणक्य हे केवळ अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी नव्हते तर त्यांच्या यशस्वी धोरणांमध्ये सामान्य माणसाचे जीवन बदलण्याची क्षमता आहे. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले नीतिशास्त्र लोकांना यशस्वी आणि आनंदी जीवन मिळविण्याचे अनेक मार्ग सांगते.

 Only such people get a high place in the society
फक्त अशा लोकांनाच समाजात उच्च स्थान मिळते, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित समस्यांचे निराकरणही सांगितले आहे.
  • आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा आधार त्याचे कुटुंबीय असतात.
  • जे लोक सेवाभावी कार्यात व्यस्त असतात, त्यांच्या घरात नेहमी पैशाची तिजोरी भरलेली असते.

Chanakya Niti In Marathi : मुंबई : आचार्य चाणक्य हे केवळ अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी नव्हते तर त्यांच्या यशस्वी धोरणांमध्ये सामान्य माणसाचे जीवन बदलण्याची क्षमता आहे. आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले नीतिशास्त्र लोकांना यशस्वी आणि आनंदी जीवन मिळविण्याचे अनेक मार्ग सांगते. पैशाची हानी टाळून श्रीमंत कसे व्हावे हेही त्यानी लोकांना पटवून सांगितले आहे. (Only such people get a high place in the society). 

चाणक्यांच्या नीतीच्या या गोष्टी जीवनात आचरणात आणल्या तर व्यक्ती कधीही अडचणीत येत नाही. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात अवलंबल्या पाहिजेत. यामुळे माणसाला अफाट संपत्ती तर मिळतेच, पण त्याला मान-सन्मानही मिळतो. 

अधिक वाचा : दोन वर्षानंतर विठूरायाला भेटणार वारकरी, आषाढी वारीची घोषणा

दुसऱ्यांची मदत करणे 

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, ज्या लोकांमध्ये इतरांना मदत करण्याचा गुण असतो आणि ज्यांच्या मनात इतरांबद्दल चांगली भावना असते, त्यांच्या जीवनातील सर्व संकटे आपोआप नष्ट होतात. असे लोक टप्प्याटप्प्याने पैसा कमावतात आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक सुखाचा आनंद घेतात. जेव्हा जेव्हा असे लोक अडचणीत येतात तेव्हा इतर लोक त्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. त्यांना समाजात नेहमी मान-सन्मान मिळतो.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जी लोक परोपकारात व्यस्त असतात आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पूर्ण करतात. त्याचे नशीब नेहमीच त्यांना साथ देते. असे लोक कोणतेही काम, व्यवसाय करतात, त्यांना भरपूर यश मिळते. त्यांच्या मार्गातील अडथळे आपोआप दूर होत राहतात.

सेवाभावी कार्य

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक सेवाभावी कार्यात व्यस्त असतात, त्यांच्या घरात नेहमी पैशाची तिजोरी भरलेली असते. त्यांच्या आयुष्यात अडचणी येत नाहीत, आल्या तरी ती लोक त्यातून सहजरित्या मार्ग काढतात. त्यांचा वंशही वाढत जात असतो. अशा लोकांना समाजात सर्वोच्च स्थान मिळते. त्यांना मानवी जीवनानंतर मोक्ष मिळतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी