Optical Illusion: शोधून-शोधून मुलगा थकला तरीही सापडला नाही बूट, पाहा तुम्हाला दिसतोय का?

Optical Illusion: सोशल मीडियावर एका फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मुलगा आपल्या डाव्या पायातील हरवलेला बूट शोधताना दिसतोय. पण त्याला काही त्याचा बूट सापडत नाहीए. पाहा तुम्हाला सापडतोय का.

optical illusion boy got upset after searching but did not find his shoe did you see
शोधून-शोधून मुलगा थकला तरीही सापडला नाही बूट, पाहा तुम्हाला दिसतोय का? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया) 
थोडं पण कामाचं
  • शाळेत जाणारा मुलगा शोधतोय त्याचा हरवलेला बूट
  • पाहा तुम्हाला मुलाला हरवलेला फोटो दिसतोय का
  • 10 सेकंदात शोधायचा आहे बूट

Optical Illusion: इंटरनेटवर ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक फोटो आहेत. या फोटोमध्ये काहीतरी कोडं दडलेले आहे. पण तीक्ष्ण नजर असलेली माणसेही कधी-कधी ही कोडी सोडवण्यात अपयशी ठरतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या चित्रात एक मुलगा त्याच्या डाव्या पायातील हरवलेला बूट शोधत आहे. तो खूप प्रयत्न करत आहे पण त्याला त्याचा बूट काहीही केल्या सापडत नाही, पााह आता तुम्हाला तरी या मुलाचा फोटो सापडतोय का ते.

फक्त 10 सेकंदात शोधा बूट 

जर तुम्हाला मुलाची मदत करायची असेल तर तुम्हाला फक्त 10 सेकंदात त्याचा हरवलेला बूट शोधून काढावा लागेल. खरं तर मुलाचा हरवलेला बूट हा त्याच्या डोळ्यांसमोरच आहे आणि तो त्याला स्पष्टपणे दिसतो देखील  आहे. पण तरीही मुलाला बूट काही सापडत नाहीत. आता तुम्ही तुमच्या तीक्ष्ण डोळ्यांनी मुलाचा हरवलेला बूट हा लवकरात लवकर शोधून त्याला देऊ शकता. खरं तर, या चित्रातील मुलाला शाळेत जायला उशीर होत आहे आणि तो या सगळ्या प्रकरणात गोंधळलेला आहे असं दिसतं आहे. त्यामुळेच त्याला डोळ्यासमोर असलेला बूट काही दिसत नाहीए. 

अधिक वाचा: Viral Video: लग्न मंडपात नववधू अन् नवरदेवाने केलं असं काही की... पाहून सर्वच झाले अवाक्

चित्रात तुम्ही खोलीभोवती विखुरलेल्या गोष्टी पाहू शकता आणि मुलगा बूट शोधून-शोधून थकला आहे. त्यानंतर तो बेडवर बसतो. तुम्हाला त्याच्या एका पायात बूट दिसत आहे, पण त्याला त्याचा दुसरा बूट काही सापडत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो बूट शोधून त्याला मदत करू शकता. चित्रातील शूज अशा प्रकारे डिझाइन केला आहे की तो कुठेही दिसत नाही.

अधिक वाचा: Girl jumped from balcony: नशेच्या गर्तेत बाल्कनीतून मारली उडी, व्हिडिओ पाहून येईल अंगावर काटा

चला तुम्हाला एक छोटीशी हिंट आम्ही देतो. जर तुम्ही मुलाच्या डावीकडे पाहिले तर तुम्हाला एक कपाट दिसेल. त्याच्या जागी एक ब्रिफकेस ठेवली आहे. तिथेच मुलाचा बूट एका कोपऱ्यात पडला आहे. तुम्हाला अजूनही बूट दिसत नसल्यास, खालील चित्र पहा. आपल्याला लाल वर्तुळात तो बूट दाखवण्यात आला आहे. 

अशाप्रकारचे Optical Illusion हे खरं तर आपल्या डोक्याला चालना देणारे असेच असतात. त्यामुळे अनेक जणांना ती कोडी सोडवणं हे खरं तर खूप आवडतं. त्यासाठीच अशी चित्र आम्ही आपल्यासाठी नेहमी आणतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी