Optical Illusion to Test Your Brain : हुशार डोक्याची माणसं अवघ्या 11 सेंकदात शोधतील जंगलात असलेली पोरगी

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Dec 08, 2022 | 16:18 IST

Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये जंगल दिसत आहे. या ऑप्टिकल भ्रमात, लोकांना या फोटोमध्ये मुलीचा चेहरा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. या चित्रात एका मुलीचा चेहरा आहे, पण ते आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यासाठी निरीक्षण करावे लागते.

Optical Illusion to Test Your Brain
हुशार डोक्याची माणसं अवघ्या 11 सेंकदात शोधतील पोरगी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये जंगल दिसत आहे.
  • ऑप्टिकल भ्रम हे मनोविश्लेषणाच्या क्षेत्राचा एक भाग आहे.
  • ऑप्टीकल इल्युजन फोटोमध्ये काही गोष्टी अशाप्रकारे लपवल्या जातात ते शोधणं खूप अवघड होत असतं.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) अनेकांची डोकी चक्रावत असतात. ऑप्टीकल इल्यूजन म्हणजे कोणता तरी असा फोटो किंवा वस्तू जे एका नजरेत ओळखणं कठीण होत असतं. त्या फोटोला किंवा त्या वस्तुला एकटक बऱ्याच वेळा पाहिल्यानंतर त्या फोटोत लपलेले रहस्य आपल्याला समजते. परंतु हे समजून घेण्यास खूप डोकं खाजवावे लागते. अशा फोटोंना ऑप्टिकल (Optical) भ्रम म्हणतात, ज्यामध्ये बहुतेक लोक लपविलेले कोडे सोडवण्यात अयशस्वी ठरतात. परंतु जर तुम्ही जर हुशार डोक्याचे असाल तर एका झटक्यात तुम्ही ते फोटो ओळखू शकातात. आज आम्ही अशीच एक इमेज घेऊन आलोय जी तुमचं डोकं खाजवेल .  (Brainy people will find the girl in the forest in just 11 seconds )

अधिक वाचा  :दुधी खा, निरोगी राहा; जाणून घ्या दुधी खाण्याचे फायदे 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये जंगल दिसत आहे. या ऑप्टिकल भ्रमात, लोकांना या फोटोमध्ये मुलीचा चेहरा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. या चित्रात एका मुलीचा चेहरा आहे, पण ते आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यासाठी निरीक्षण करावे लागते.

Jagranjosh

 सामान्य मानवी मेंदू प्रत्येक बाजूकडून भिन्न धारणा बनवून वस्तू किंवा फोटो वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. तर, ऑप्टिकल भ्रम हे मनोविश्लेषणाच्या क्षेत्राचा एक भाग आहे. कारण ते अशा काही फोटो तुम्ही कोणत्या प्रकारे पाहतात, यावर ते अभ्यास करतात. दरम्यान असे ऑप्टकल फोटो पाहून लोकं गोंधळून जात असतात. परंतु त्यांना ही कोडे सोडविणयात मजा येत असते. या फोटोमध्ये काही ना काही गोष्ट दडलेली आहे जी दिसत नाहीये. ही चित्रे डोक्याला उत्तम व्यायाम  देत असतात.

अधिक वाचा  : 'या' 5 गोष्टी आहेत माणसाच्या प्रगतीचे सीक्रेट्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेले ऑप्टिकल इल्युजन फोटो हे  उत्तम उदाहरण मानता येईल. दरम्यान ऑप्टीकल इल्युजन फोटोमध्ये काही गोष्टी अशाप्रकारे लपवल्या जातात ते शोधणं खूप अवघड होत असतं. हा व्हायरल फोटो नीट पहा आणि मुलीचा चेहरा कुठे दिसतो ते सांगा. तुम्हाला चित्रातील मुलीचा चेहरा शोधण्यासाठी एक वेळ दिला जातो, त्या वेळेतच मुलगी शोधायची आहे. 

Jagranjosh

व्हायरल झालेल्या या चित्रात मुलीचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर आहे, मात्र तो दिसत नाही. चित्रातील चेहरा अतिशय हुशारीने लपविला गेला आहे, जो शोधण्यात चांगले-चांगले लोकही अयशस्वी झाले आहेत. आता हे कोडे सोडवता येते की नाही ते पाहू.


दरम्यान, या चित्रात जंगलाच्या मध्यभागी असलेल्या मुलीचा चेहरा 11 सेकंदात दिसत असेल तर तुम्ही एक प्रतिभावान आहात.जर  तुम्हाला चित्रात चेहरा सापडत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तुम्ही सहज पाहू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी